खूप श्रीमंत.. खूप खूप श्रीमंत.. आणि मग येतात नाना शंकरशेठ

खूप श्रीमंत.. खूप खूप श्रीमंत.. आणि मग येतात नाना शंकरशेठ

31 जुलै नाना उर्फ जगन्नाथ शंकरशेठ यांची पुण्यतिथी. अंबानी, टाटा बिर्ला यांच्यापेक्षाही श्रीमंत माणसं मुंबईत होऊ गेलीत. तीही मुंबईत. ज्यांनी मुंबईला श्रीमंत केलं, त्या शेठ माणसांत नानांचं नाव घेतलं जातं. पैसे ही कमावले. समाजही घडवला. नानांनी नाना गोष्टी केल्या.

मुक्ता परब – घरात कालनिर्णय असेल ना? जरा उघडून बघा. 31 जुलैला नाना शंकरशेठ पुण्यतिथी असं लिहिलं असेल. मुंबईत ठिकठिकाणी नाना चौक असतील. त्यातल्या अनेक चौकांची, रस्त्यांची नावं नाना शंकरशेठ यांच्यावरुनच दिलेली आहेत. लगे रहो मुन्नाभाई (LAGE RAHO MUNNABHAI) पाहिला असेल तर त्यातला शेवटचा सीन आठवा. मुन्ना आणि सर्कीटला आपलं नाव चौकाला द्यावं, असं वाटतं. मुन्ना, सर्कीटला वाटत असणारी गोष्ट नानांच्या बाबतीत मात्र सत्यात उतरली. त्यासाठी नानांनी कामही शेठ माणसासारखंच केलं. नाना गोष्टी करणारा हा माणूस आहे तरी कोण?

– नानांची बेसिक इन्फो –

पूर्ण नाव – जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे
जन्म- ठाणे जिल्ह्यातील मुरबाडमध्ये
जन्मदिनांक – 10 फेब्रुवारी, 1803
मृत्यू दिनांक – 31 जुलै, 1865
वडलांचं नाव – शंकरशेठ मुरकुटे
आईचं नाव – भवानीबाई मुरकुटे

मुरकुटे आडनावाने नाना कधीच ओळखले गेले नाहीत. त्यांना पहिल्यापासूनच ओळखलं जातं ते नाना शंकरशेठ म्हणूनच. तसंही भल्याभल्यांनी सांगितलंच आहे. नावात काय ठेवलंय. काम बडी चीज है, शेठ! नानांचं काम इतकं भरीव आणि जबरदस्त आहे, की मुंबई सेंट्रल स्थानकालाही त्यांचं नाव देण्याचा प्रस्ताव आहे. पहिली रेल्वे धावली, त्यातून ज्या थोड्या लोकांनी प्रवास केला, त्यात नानाही होते. महत्त्वाचं म्हणजे रेल्वेच्या तिकीट बुकींग आणि ऑफिसच्या कामासाठी त्यांनी स्वतःच्या बंगल्याचीही जागा दिल्याचे उल्लेख आहेत.

Source – Google

– रेल्वेसाठी भरीव काम –

-1845 मध्ये इंडियन रेल्वे असोसिएशनची स्थापना
-1 ऑगस्ट 1849 रोजी ‘द ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वे’ (GIPR) ची स्थापना
-GIPRमध्ये दोनच भारतीय, एक जमशेटजी जिजिभोय आणि दुसरे नाना शंकरशेठ
-रेल्वेच्या कामावर बारीक लक्ष
-नानांच्या प्रभावामुळे आशियातली पहिली रेल्वे मुंबईत धावली

बीबीसी मराठीने लिहिलंय की, 167 वर्षांपूर्वी, 16 एप्रिल 1853 रोजी, दुपारी साडेतीन वाजता 21 तोफांची सलामी स्वीकारत मुंबईतील बोरिबंदरहून (आताचं CSMT) ठाण्याच्या दिशेनं भारतातील पहिली रेल्वेगाडी ट्रॅकवरून धावली. या बोरिबंदर स्थानकात आजही ज्या एकमेव भारतीयाचा पुतळा आहे, तो आहे नाना शंकरशेठ यांचा.

नानांची आई लहानपणीचं गेली. वडिलांनीच त्यांना लहानाचं मोठं केलं. त्यामुळे लहानपणापासून घर, व्यापार, हे सगळं जवळून बघितलेल्या नानांनी अल्पावधितच बऱ्याच गोष्टी शिकून घेतल्या. त्यात त्यांना सामाजिक जबाबदारीचं भानही खूप लवकर आलं होतं, असं अनेक लोक सांगतात. त्यामुळे त्यांनी केलेली संस्थात्मक काम आजही आपल्यामध्ये जिवंत आहेत.

-नानांची संस्थात्मक कामं-

-1822मध्ये मुंबईची हैंदशाळा आणि स्कूल बूक सोसायटीची स्थापना
-त्याचीच पुढे जाऊन ‘बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’ झाली
-उच्च शिक्षणासाठी एलफिन्स्टन फंड गोळा केला
-1827 एलफिन्स्टन हायस्कूल आणि कॉलेज सुरु केलं
-1841मध्ये बोर्ड ऑफ एज्युकेशनच्या मंडळावर गेले
-16 वर्ष सलग निवडून आले
-ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना
-1851 मध्ये पूना संस्कृत कॉलेजची सुरु (आताचं डेक्कन कॉलेज)
-1857 मध्ये बॉम्बे युनिवर्सिटीच्या स्थापनेत मोठा हात (आताचं मुंबई विद्यापीठ)
-जेजे स्कूल ऑफ आर्टच्या स्थापनेच मोठा वाटा
-मुलींसाठी शाळा सुरु केली
-सतीप्रथेला विरोध

-राजकीय कारकीर्द-

1861 – मुंबई प्रांताच्या विधिमंडळात स्थान
1862 – तत्कालीन मुंबई प्रांताच्या गव्हर्नचे सल्लागार
बॉम्बे मुन्सिपल कायदा तयार करण्यात मोठा वाटा
याच कायद्यामुळे पुढे मुंबई महापालिकेची स्थापना

Source – Google

– नानांची दर्यादिली –

-मरिन लाईन्स ते मलबार हिल परिसरातील मोठी जमीन दान
-आजही या भागात जगन्नाथ शंकरशेठ स्मशानभूमी
-आजची राणीची बाग उभी करण्यातही सिंहाचा वाटा
-1862मध्ये व्हिक्टोरीया गार्डन संस्थेची स्थापना झाली.
-वस्तुसंग्रहालय, मर्कटाईन बँक, सेंट्रल बँक ऑफ वेस्टर्न इंडिया याच्या उभारणीतही मोलाचं योगदान

सुरुवातीच्या काळात बदलणाऱ्या मुंबईच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय बदलात नाना शंकरशेठ यांचं काम मोठं आहे. त्यांनी तेव्हा करुन ठेवलेल्या गोष्टी आजही आपल्यात आहेत. नाना पहिल्यापासूनच श्रीमंत होते, असे संदर्भ गुगलवर अनेक ठिकाणी आहेत. टिपू-इंग्रज युद्धात मुरकुटेंना अमाप पैसा मिळाला होता. त्यातून त्यांनी भरपूर संपत्ती गोळा केली. नानांचे वडील शंकरशेट मुरकुटे वैभवसंपन्न होते.

माणूस श्रीमंत म्हणून जन्माला येणं, हे नानांच्या बाबतीत घडलंच. पण कामाच्या बाबतीचही त्यांची श्रीमंती वाखाण्याजोगी आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा मुंबईचा उल्लेख येईल, तेव्हा तेव्हा नानांना विसरुन पुढे जाता येणार नाही. ग्रेट माणूस. ग्रेट वर्क.

हेही वाचा – सिंगल स्क्रीनवरुन फोन स्क्रीनवर कशी आली ऍडल्ट फिल्म?
हेही वाचा – प्रमोद महाजनांची मर्डर मिस्ट्री सस्पेन्स थ्रिलरपेक्षा कमी नाही!
हेही वाचा – 2 वर्षांचा असताना वडील गेले, पेन्शनवर शिकला, आज करोडोत खेळतोय
हेही वाचा – इन्फोसिसची नोकरी सोडली आणि पाणीपुरी विकून कमाल केली

हेही इंटरेस्टिंग आहे...

जेव्हा सोनाली बेंद्रे राज ठाकरेंसोबत एअरपोर्टवर जाते…

जेव्हा सोनाली बेंद्रे राज ठाकरेंसोबत एअरपोर्टवर जाते…

भाऊ तोरसेकर… प्रतिपक्ष की पक्षपाती?

भाऊ तोरसेकर… प्रतिपक्ष की पक्षपाती?

‘कोरोनामुक्त झालो, पण प्रवास सोप्पा मुळीच नव्हता’ | भाग 02

‘कोरोनामुक्त झालो, पण प्रवास सोप्पा मुळीच नव्हता’ | भाग 02

लक्षणं नसलेल्या कोरोनाग्रस्तांकडूनही धोका?

लक्षणं नसलेल्या कोरोनाग्रस्तांकडूनही धोका?

No Comment

Leave a Reply