सिंगल स्क्रीनवरुन फोन स्क्रीनवर कशी आली ऍडल्ट फिल्म?

सिंगल स्क्रीनवरुन फोन स्क्रीनवर कशी आली ऍडल्ट फिल्म?

लल्लनटॉप.कॉमसाठी प्रतीक्षा पीपीने लिहिलेल्या अभ्यासपूर्ण लेखाचा हा मराठी अनुवाद..

टीम रिडर – बहू-ससुर, भाभी-देवर, पड़ोसन: सिंगल स्क्रीन से फोन की स्क्रीन तक कैसे पहुंचीं एडल्ट फ़िल्में- असं या लेखाचं मूळ शीर्षक आहे. मराठीत एडल्ट सिनेमे किंवा बी ग्रेड, सी ग्रेड असा सिनेमा अजूनतरी नसला तरी मराठी प्रेक्षक अनेकदा सॉफ्ट पॉर्न पाहण्यासाठी हिन्ही किंवा तामिळ किंवा सो कॉल्ड मल्लू मसाला सिनेमांकडे वळतात, हे उघड वास्तव आहे. त्या पार्श्वभूमीवर नेमका सिंगल स्क्रिवरुन फोन स्क्रीनपर्यंतचा हा एडल्ट सिनेमांचा आणि वेब सीरिजचा प्रवास रंजक आहे. मुंबई संध्या सारख्या सिनेमांमध्ये नितंब, स्तन, मामी- भाचा, भरलेली वांगी सारखी विशेषण जितकी गाजली तितक्यात ताकदीनं सध्या ऑनलाईन हॉट वेब सीरिज गाजत आहेत.

‘मैं कविता. मैं आपको अपना पूरा नाम नहीं बता सकती. क्योंकि आप मुझे मेरे नाम के लिए नहीं देख रहे. आप मुझे मेरे जिस्म के लिए देख रहे हैं. मेरे जिस्म की गर्मी के लिए देख रहे हैं. मुझे लोग कविता भाभी के नाम से जानते हैं. खाते-पीते घर की, भरी हुई माल कविता भाभी.’

या संवादासह थेट तुमच्या भावविश्वात कविता भाभी प्रवेश करते. कविता भाभी हा फोन सेक्सचा एक प्रकार आहे. फोनवर कविता भाबी आपल्या ग्राहकांना आपल्या आयुष्यातल्या खऱ्या खुऱ्या गोष्टी सांगू लागते. मसालेदार गोष्टी. अगदी रंगवून. आपला नवरा गे असल्याचं कविाता सांगते. तो कविताला शरीर सूख नाही देऊ शकत. कविताची सासू आजारी आहे. सासऱ्यांवर कर्ज आहे. आणि म्हणून फोन सेक्सचं काम करुन ती पैसे कमावते. थोडे-थोडके नाही. बक्कळ पैसे कमावते.

कविता भाभी हे कोणतं पुस्तक नाही, जे लपून विकलं जातंय. किंवा कोणती वेबसाईटही नाहीये, जिला प्रॉक्सी साईट वर पाहिलं जातं. यात असा कोणताही कमरेखालचा सीन नाहीये, जो न्यूडिटीमध्ये मोडू शकेल. कविता भाभी पॉर्न नाहीये. पण कौटुंबीक गोष्टसुद्धा नाही आहे. ही दुनिया आहे आटीटी इरॉटिकाची. ज्याचे ऍप्स तुम्ही सर्रास तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल करताना लाजत नाही. पण या ऍपमधल्या गोष्टी तुम्ही एकट्यातच पाहता.

डर्टी असूनही क्लीन…

दोन कपल एका गेस्ट हाऊसमध्ये जातात. गेस्ट हाऊसमध्ये एक थर्की वेटर आहे. स्विमिंग पूलमधल्या मुलींकडे त्याची बारीक नजर आहे. क्लीवेज, पोट, कंबर, मांड्या. प्रणय भावना जाग्या होतील अशा प्रत्येक अंगावर झूम करण्यात आलंय. बँकग्राऊंडला सॅक्सोफोनचं म्युझिक भावना आणखी उत्तेजित करण्यासाठी मदत करंतय. जेव्हापासून पूलमधून दुधासारखी पांढरी शुभ्र गोरी मुलगी बाहेर येताना थर्की वेटर जसा त्या मुलीकडे चोरुन पाहतोय, नेमक्या त्याच प्रकारे स्क्रीनमागून सगळे थर्की लोग तेव्हापासून या सीरिज पाहताएत.

ULLU नावाचं एक ऍप आहे. कुकू स्ट्रिमिंग ऍपवर असलेल्या कपल्स गेस्ट हाऊसमध्ये हा सीन आहे. या सीनमध्ये न्यूडिटी श्रेणीत टाकण्यासारखं काहीच नाही. असे किंबहुना यापेक्षा जास्त उघडे नागडे सीन आपण बॉलीवूड सिनेमात पाहिले आहेतच ना?

हॉटेल मॅनेरजने काही रुममध्ये छुपे कॅमेरे लावलेत. एकानंतर एक कपल्स येतात. त्यांचे व्हिडीओ निघतात. यातच संपूर्ण कथानक आहे. एका कपलचा व्हिडीओ एका पॉर्न साईटवर अपलोड होतो. पोलिस तपास करतात आणि गुन्हेगाराला अटक करतात. कागदावर ही गोष्ट एका गुन्ह्याची आहे. पण जोपर्यंत क्लायमॅक्स येत नाही, तोपर्यत तुम्ही कधी हॉटेल मॅनेजर तर कधी हॉटेलच्या वेटर सारखे तीनचा वेळा सेक्स सीन पाहून झालेले असता.

साधारण अशाच कथानकावर आधारीत सीरिज वेगवेगळ्या ओटीडी प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सापडेल. जी तुम्हाला नेटफ्लिक्स, प्राईम किंवा झी-फाईव पेक्षा कमी पैशांत एव्हेलेबल आहे.

मधाळ गोष्टी

कोणत्याही समाज सॉफ्ट पॉर्न असणं ही काही नवी गोष्ट नाहीये. रेल्वे स्टेशनच्या बुकस्टॉलवर एक नजर टाका. तिथे तुम्हाला अशा अनेक मथाळ गोष्टी असणारी पुस्तकं दिसतील. त्यातल्या एका हिंदी पुस्तकातील गोष्टींची नावं काहीशी अशी होती….

  1. गोरे जिस्म का जूनून
  2. अलमारी में बंद बहू की वासना
  3. सेक्स के लिए बीवी को शराब की लत
  4. कामुक मर्द की कातिल सोच
  5. सहेली की ब्रेसरी में सेक्स का राज़
  6. मादक देह का ‘खजाना’ चूमने की ख्वाहिश

एका पुस्तकात साधारण 10 ते 15 गोष्टी असतात. सगळ्या खऱ्या घटनांवर आधारीत. अनेकदा आपण पत्नी आपल्या प्रियकराबरोबर पळून गेल्याच्या बातम्या वाचतो. एक माणूस कसं अफेअर करतो. लव ट्रँन्गल कसा एखाद्या हत्येला कारणीभूत ठरतो. वर्तमानपत्रांच्या शहरांमधील बातम्या सांगाणाऱ्या पानातील या बातम्या जराही मधाळ नसतात. निव्वळ रक्तपात, हत्या, खून, खोटं. पण या सगळ्या घटनांच्या गोष्टींचं नाट्यरुपांत दाखवताना मात्र अत्यंत मधाळ असल्यासारखं भासवलं जातं.

पुस्तकात यो गोष्टी वाचनाता तुम्ही पान 32 वर पोहोचता. वाचता वाचता तुमच्या लक्षात येतं की पुस्तकाची छपाई अत्यंत वाईट दर्जाची आहे. सत्य घटनेवर आधारीत लोकांचे फोटोही छापण्यात आलेत. पण ते तितकेसे आकर्षक नाही. पण पुस्तकाचं कवर पेज एका चिकन्या कागदावर छापलेलं असतं. ज्यात नाट्य रुपांतरच्या इराद्याने लावलेला एखादा फोटो वापरलेला असतो. कविता भाभीच्या शब्दांत सांगायचं तर या सर्व स्त्रिया भरलेल्या असव्यात. क्लीवेज किंवा त्या स्त्रियांच्या मांड्यांना आपल्या ओठांनी स्पर्श करणारा एका पुरुष असावा.

‘नितंब’, ‘स्तन’, ‘रसाळ’, ‘मधाळ’, ‘मादक’, ‘भरलेल्या’, ‘ओल्या’, यांसारख्या शब्दांनी सुरु झालेल्या या सगळ्या प्रणयकथा ‘वाढलेला श्वास शांत होण्यापर्यंत’ येऊन थांबतात.

आता माध्यम बदललंय. ओटीटीवर दिसणाऱ्या याच गोष्टी, सत्यघटनेवर आधारीत तत्सम मधाळ कथा नवं रुम लेवून समोर येतात. मॉडर्न पॉर्न फिल्ममध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रॉपर्टी त्यात ठळकपणे दिसतात. लॉन्जरे किंवा आकर्षक ब्रा, मेकप, हील वाल्या चपला, उच्चभ्रू घरातल्या रुमप्रमाणे दिसणारी सजावट, असं सगळं खचाखच भरलेलं आहे. ही घडलेली गोष्ट नसली तरी लेखकाने आपल्या कल्पनाशक्तीला बहर देत मीठ-मसाला लावलाय. सत्य घटनेवर आधारीत गोष्टीला कस्टमाईज करण्यात आलंय. काय झालं यापेक्षा काय होऊ शकतं, यावर आधारीत ही नवी मधाळ गोष्ट आहे.

पण प्रश्न घुटमळत राहतो. जेव्हा इंटरनेटवर फुकट हार्डकोअर पॉर्न उपलब्ध असूनही लोकं सॉफ्ट पॉर्नचं सब्सक्रिप्शन घेतातच का. यूट्यूबवर हे सगळ्यात जास्त का शोधलं जातंय?

व्याकरण

तुमच्यासमोर दोन गोष्टी खायला ठेवलेल्या आहेत. फुकट ट्रफल केक ठेवलेलाय आणि 5 रुपयांत जिलेबी मिळतेय. अशावेळी तुम्हा काय खाल? शक्य आहे ही थोड्या थोड्या अंतराने तुम्ही दोन्हीही खाल कदाचित. कारण एक फुकट आहे. आणि दुसरी गोष्टी खरेदी करण्याची तुमची ऐपतही आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म जसं की कूकू, एमएक्स प्लेयर, अल्ट बालाजी सारखे काही शो किंवा मग उल्लू टीव्ही आपल्यासाठी या जिलेबीसारखेच आहेत. या ‘जिलेब्या’ ताजा तर आहेतच पण त्या चांगल्या ‘दुकाना’तल्याही आहेत.

व्हिडीओ स्वरुपात सॉफ्ट पॉर्न किंवा इरॉटिकाचं असणं खूप आधीपासून सुरु आहे. भारतात डेटा पॅक आल्यापासून म्हणजे 10-12 वर्षापूर्वीच हा सगळा प्रकार सुरु झालेला आहे.. यूट्यूबच्या एन्ट्रीनंतर म्हणजे 2008मध्ये काही कडक नियम नव्हते.. कम्युनिटी गाईडलाईन्सचं पालन करण्यासाठी सक्तीचे निर्देश नव्हते. पायरसीवरही काही ठोस अशी नियमावली नव्हती. कंटेंटवर तर अजिबातच नव्हती. त्यामुळे सुरुवातीचा 6-7 वर्ष यू-ट्यूबवर सॉफ्ट पॉर्न जोरात चाललं. त्याची एक वेगळी इंडस्ट्रीच उभी राहिली. मात्र क्मयुनिटी गाईडलाईन्सचे नियम कडक झाल्यानंतर या सगळ्यांचा बाजार उठला. नियम बदलले. अशातही सॉफ्ट पॉर्नचा धंदा यू-ट्यूबवर सुरुच राहिला. यात स्त्रियांचे फक्त निपल दाखवले जात नसत. पण डबल मिनिंग निघणारे संवाद, रसपूर्ण चित्रिकरण आणि सेक्यूअर भावनांनी भरलेले व्हिडीओ फार हिट्स मिळवत होते.

2016 साली लल्लनटॉपने केलेल्या रिपोर्टनुसार…

देसी जलवा च्या एका व्हिडीओला 2.80 कोटीपेक्षा जास्त लोकांनी पाहिलंय. मॅटिनी मस्तीचा एक व्हिडीओ आहे, ज्याचं नाव आहे, इंडिअन भाभी चीटेड डॉक्टर. या व्हिडीओला तब्बल 1.99 कोटी व्हूज आहेत. मनोरमा की कहानियां चॅनेलवरील आफ्टर सॅटिसफाईंग व्हिडीओ 1.37 कोटी लोकांनी पाहिलाय. ही आकडेवारी त्या वेळी झालेल्या कथित वायरल व्हिडीओच्या तुलनेत खूप मोठी होती. शाहरुख-सलमानच्या सिनेमांच्या ट्रेलरपेक्षाही हे असले मधाळ व्हिडीओ जास्त लोकांनी पाहिल्याचं, या आकडेवारीवरुन लक्षात येतं.

अवघ्या गेल्या 1 वर्षात काही व्हिडीओ आश्चर्यकारकरीत्या करोडोंच्या संख्येने पाहिले गेलेत. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये ‘पड़ोसन’, ‘टीचर’, ‘कॉम्प्रोमाइज’, ‘देहाती’, ‘देसी’, ‘कामवाली’, असे शब्द आढळून आलेत. हे सर्व व्हिडीओ हिन्दी, भोजपुरी, बंगाली किंवा रिजनल भाषेत असतात. यांचं बजेट लहान असल्याचं तुम्हाला व्हिडीओ पाहून लगेच ध्यानात येईल.

इतकंच काय तर या व्हिडीओच्या खाली तुम्हाला काही विचित्र कमेंट्सही सापडतील. सेक्स वर्क किंवा सेक्स चॅटशी संबंधित काम करणारी काही लोक आपले नंबर कमेन्टमध्ये शेअर केल्याचं तुम्हाला दिसून येईल. यासाठी एक फेक अकाऊंटची मदत घेतली जाते. विश्वास नसेल तर तुम्हीही याचा थोडा रिसर्च करु शकता. हिन्दुस्तान टाईम्सच्या एका रिपोर्टनुसार 2016 पर्यंत यूट्यूबवर तब्बल 500 पेक्षा जास्त सॉफ्ट कोअर चॅनल अस्तित्त्वात होते. आता त्याची संख्या आणखी वाढलेली देखील असू शकते.

पण ओटीटी चॅनेलवर दिसणारे व्हिडीओ असे नाहीत. या व्हिडीओजचं बजेट मोठं आहे. यात लाखो रुपये लागलेत. यात काम करणारे व्यावसायिक कलाकार किंवा माहीर अभिनेते नसले, तरी त्याचं असणं हे असहज आणि भावहीन नाहीये. यूट्यूबच्या सॉफ्ट पॉर्न व्हिडीओच्या तुलनेत ओटीटीवरील इरॉटीक व्हिडीओ दर्जेदार आहेत. कोणत्या मेनस्ट्रीम सिनेमाप्रमाणे याचे निर्माता, दिग्दर्शनक, कास्टिंग करणारे, लेखक, संवाद लेखक हे सगळे तज्ज्ञ लोक या व्हिडीओच्या निर्मितीप्रक्रियेत आहेत.

कूकू टीव्ही वर शीमेल , सुनो ससुरजी सारख्या शो चे लेखक-दिग्दर्शक आझाद भारती सांगतात –
जे सिनेमे आधी येत होते, ते छोट्याशा सिनेमागृहात लागत असत. त्याच्या तुलनेत प्रॉडक्शन मूल्य चांगलंय. प्रत्येक प्रोजेक्टची किंमत वेगवेगळी असते. पण सरासरी 2 ते 10 लाखापर्यंतच बजेट यासाठी लागतं. जशा टीव्हीवरील मालिकाचं चित्रीकरण केलं जातं, त्याचप्रमाणे आम्ही शूटिंग करतो. यात असं काहीही नाही, ज्याला मान्यता नाही. ज्या अभिनेत्यांना काम दिलं जातं, त्यांना निवडण्याचीही सारखीच पद्धत आहे. एजेन्सीकडून कास्टिंग होतं. आणि त्यानंतर फिल्म साईन केली जाते. व्यावसायिक सिनेमांप्रमाणे इथेही प्रक्रिया राबवली जाते.


ओटीटी वर दिसणारा कंटेटला एक व्यावसायिक रुप दिल गेलंय. एका सॉलिड कॉम्बिनेशनच्या रुपात हा कंटेट प्रेझेंट केला जातो. हा कंटेट देशी असल्याचा दर्जा मेन्टेनही करतो. भाभी, मोलकरीण, दूधवाला सारख्या भूमिकांना त्यांच्या भूमिकेप्रमाणे देसीपण देण्याचा ओतप्रोत प्रयत्न असतो. तर दुसरीकडे तितक्यात ताकदीचं प्रोडक्शनही पाहायला मिळतं. कपडे, सेट या सगळ्यातच ओटीटीचा कंटेट जास्त उजवा वाटू लागतो.

पळवाट

सेक्स होताना बघणं, किंवा तत्सम गोष्टी वाचणं, म्हणजे जगापासून दूर पळणं आहे. पण अशाप्रकरे बघण्याने-वाचण्याने फक्त सुख मिळत नाही. या गोष्टी एका अशा दुनियेत आपल्याला घेऊन जातात, ज्याच्या आनंदाचा आणि सुखाचा आपल्याला जराही अंदाज नाही. कारण या दुनियेत जात-पात, श्रीमंत-गरीब असा भेद नाहीये. म्हणजे या गोष्टी समाज सुधारक किंवा समानता आणणाऱ्या आहेत, असा अजिबात नाही. या गोष्टींमध्ये मुळातच काही कॉन्टेक्स्ट नाही, असा त्याचा अर्थ आहे. समाजात काय चाललंय, त्याच्याशी या गोष्टींना काहीही फरक पडत नाही, असं त्यातून लख्खपणे दिसतं.

नळ ठीक करायला आलेला प्लंबर, दूध द्यायला आलेला दूधवाला, किंवा घरकाम करणारा नोकर, आणि अगदीच चोरासोबत कुणी मध्यमवर्गीय स्त्री शारीरिक संबंध ठेवण्यासारख्या गोष्टी केल्याचं किंवा अशी गोष्ट ऐकल्याचं तरी तुम्हाला आठवतं का? पण याच्या बरोबर उलट गोष्ट जरुर दिसते. पुरुष आपल्या मोलकरणीसोबत संबंध ठेवतो. आणि याची कल्पना करणंही अशक्य वाटत नाही.

सत्तेचं गणित जसं पलटतं, तसे लगेच आपल्याला गुदगुल्या होतात. खऱ्या आयुष्यात आपल्या पत्नी, मुली, बहिणी, आई, मोलकरीण, महिला सहकारी आणि वेश्यांना कमीपणा दाखवणारा पुरुषी समाज महिलांना पॉर्न व्हिडीओमध्ये सत्ता गाजवणाऱ्या महिलेला पाहून चेकाळतो. तिला गादीवर पाहणं, ही एक अल्टिमेट फॅन्टसीसारखंच आहे. ही गोष्ट आपल्या पुरुषी समाजात जितक्या सहजपणे सिंगल स्क्रीनवरुन फोन स्क्रीनवर आलेली ऍडल्ट फिल्म स्वीकारली गेली आहे.

हेही वाचा – ब्रेकअप झालाय? मग तर हे सिनेमे पाहायलाच हवे!
हेही वाचा – आजारी असाल तर हे सिनेमे बघा! बरं वाटेल

हेही इंटरेस्टिंग आहे...

घर खरेदी करणं चांगलं की भाड्यानं राहणं चांगलं?

घर खरेदी करणं चांगलं की भाड्यानं राहणं चांगलं?

कुठे गाडी लावू? उबर की ओला? | धंदा एके धंदा

कुठे गाडी लावू? उबर की ओला? | धंदा एके धंदा

मोदीविरोधी Official PeeingHuman जन्माला कसं आलं?

मोदीविरोधी Official PeeingHuman जन्माला कसं आलं?

No Comment

Leave a Reply