मोदीविरोधी Official PeeingHuman जन्माला कसं आलं?

मोदीविरोधी Official PeeingHuman जन्माला कसं आलं?

Official PeeingHuman हे काही मोदीविरोधी किंवा भाजप विरोधी पोस्ट करणारं एकमेवर चॅनेल नाही. असे अनेक आहेत. पण आतापुरतं Official PeeingHumanवरच बोलणार आहोत. हे कोण चालवंत? यामागे कुणाचं डोकं आहे? आणि नेमकं हे अस्तित्वात आलंच का?

टीम रिडर – Official peeing human या नावाचं एक फेसबूक पेज आहे. यूटूयब चॅनेल आहे. ट्वीटर अकाऊंटही आहे. सोशल मीडियावरच्या सगळ्यात प्लॅटफॉर्मवर हे चॅनेल सापडेल. भाजपला थेट विरोध करणारं अशा काही मोजक्या पण आपली लाईन क्लिअर असणाऱ्या पेजेसपैकी एक. Official PeeingHuman हे काही मोदीविरोधी किंवा भाजप विरोधी पोस्ट करणारं एकमेवर चॅनेल नाही. असे अनेक आहेत. पण आतापुरतं Official PeeingHumanवरच बोलणार आहोत. हे कोण चालवंत? यामागे कुणाचं डोकं आहे? आणि नेमकं हे अस्तित्वात आलंच का?

You'll never know how bad you looked till you grow a beard and look at your clean shaven photos.

Official PeeingHuman यांनी वर पोस्ट केले शुक्रवार, ३ नोव्हेंबर, २०१७

मोदी सरकार 2014 साली आलं. त्यानंतर दोन गट तयार झाले. एक जो मोदींच्या बाजूने आहे असा. आणि दुसरा जो मोदींच्या विरोधात असणारा. या दोन्ही गटांमध्ये सोशल मीडियावर वादळी चर्चा होते. कधीकधी ती विकोपालाही जाते. अशातच एक फेसबूक पेज तयार झालं. या पेजवरुन मोदींनाच नव्हे तर एकूण भाजपच्या धोरणांना सटायर पद्धतीने टीका करण्याचं काम सुरु आहे. व्हीडीओ, फोटोच्या माध्यमातून हे सगळं सुरु आहे.

8 जुलैला Official PeeingHuman या पेजला 8 लाख 1 हजार 347 लाईक्स आहेत. तर तब्बल 12 लाख 69 हजार 25 लोक फॉलो करतात. दिवसेंदिवस हा आकडा वाढत जातो आहे. आज चेक करुन पाहाल, तर कदाचीत संख्या यापेक्षा वाढलेली दिसेल. यू ट्यूबवर 8 लाख 79 हजारपेक्षा जास्त सबस्काईबर्स आहेत. आता बोलुयात हे पेज तयार करणाऱ्यांबद्दल.

https://www.facebook.com/photo?fbid=10156340854655709&set=a.470931525708

मोदीविरोधी किंवा भाजपविरोधी कंटेट तयार करणाऱ्या Official PeeingHuman या फेसबूक पेज आणि यू-ट्यूब चॅनेलचा कर्ताधर्ता आहे रमीत वर्मा (Ramit Verma). रमीत वर्मा कोण आहे, हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यानंतर आम्हाला काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स समोर आले.

Modi ji adjudged 'Best PM with Extra-Curricular Activities' in the World by UNESCO.#Jio #Modi #Jio

Official PeeingHuman यांनी वर पोस्ट केले शुक्रवार, २ सप्टेंबर, २०१६

रमीत वर्मा एक तरुण मुलगा आहे. अभ्यासात हुशार. मूळचा नवी दिल्लीचा असल्याचं त्याचा फेसबूक पेजवरुन कळतंय. 5 हजारहून अधिक लोकं त्याला फेसबूकवर फॉलो करतात. सध्या रमीत मुंबईमध्ये राहतो. हन्स राज कॉलेजात रमीतचं शिक्षण झालंय. Official peeing human या पेजचा मालक आणि या पेजवर येणाऱ्या कंटेटचा निर्माता रमीतच आहेत.
रमीत खरंतर गुगलमध्ये कामाला होता. गुगलमधली नोकरी सोडून, फेसबूक पेज किंवा यू-ट्यूब चॅनेल चालवण्याचं खूळ त्याच्या डोक्यात कुठून आलं?

#Mannkibaat #BAEkaar #1bottledown #chaipecharcha

Official PeeingHuman यांनी वर पोस्ट केले मंगळवार, १४ जुलै, २०१५

फोर्ब्सइंडिया या वेबसाईटने रमीतची मुलाखत केलीये. 26 मार्च, 2019ला ही मुलाखत त्यांनी वेबसाईटवर शेअर केली आहे. अजूनही ती मुलाखत वाचता येऊ शकेल.

फोर्ब्स इंडियाच्या प्रणित सर्डा यांनी रमीत वर्माशी बातचीत केली. गूगलमधली नोकरी सोडून मीम्स, व्हिडीओ आणि असं सगळं करावंसं का वाटलं, असा प्रश्न रमीतला विचारण्यात आला. त्यावेळी त्याने दिलेलं उत्तर फारच मस्त होतं. रमीत म्हणाला, सत्तेत असलेल्या लोकांची खिल्ली उडवायला मला फाज मजा येते. मला त्यानं समाधान मिळतंय. सत्तेत असलेल्या लोकांना त्यांची सत्ता विसरुन माणसात आणण्यासारखं वाटतं, हे काम करताना.

‘आखिर हम करे तो करे क्या, बोले तो बोले क्या’ आणि ‘वाह मोदीजी वाह’, या दोन वाक्यांनी तर रमीतच्या व्हिडीओजला एक ओळखच बनवून दिली आहे. रमीतच्या प्रत्येक व्हिडीओच्या शेवटी ही दोन वाक्य बहुतांश वेळा असतातच.

जेव्हा मोदीजी गाणं गातात.. जीने के है चार दिन…

फेसबूक आणि यू-ट्यूब पेज चालवून किती पैसे मिळत असतील रमीतला, असा एक प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. तर डिजीटल मार्केटींग केलेल्या अनेकांना एफिलीएट मार्केटींग (Affiliate marketing) हा प्रकार माहित असेलच. त्यातूनही रमीत बऱ्यापैकी पैसे कमावतो. मोदीविरोधी विनोदांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या कुणाल कामरासोबत (Kunal Kamra) रमीत एक कार्यक्रमही करतो. या कार्यक्रमाचं नाव आहे, शट अप या कुनाल (Shut Up Ya Kunal). पण तरीही गुगलमधली नोकरी सोडण्याचं धाडस करणं, हे काही प्रत्येकाला जमतंच असं नाही. रमीतने मात्र ते धाडस केलं.

@Tejas Surnaik

Official PeeingHuman यांनी वर पोस्ट केले सोमवार, १२ नोव्हेंबर, २०१८

@Ajaj Vahora

Official PeeingHuman यांनी वर पोस्ट केले सोमवार, १२ नोव्हेंबर, २०१८

हॉलिवूड (Hollywood) आणि बॉलिवूडचे (Bollywood) मीम्स बनवण्याचं काम आधी रमीत करायचा. त्यासाठी 5 हजार रुपये मिळायचे. यातूनच त्याचा आत्मविश्वास दुणावला. कंटेट चांगला असेल, तर तो वायरल (viral) व्हायला वेळ लागत नाही. व्हिडीओ वायरल झाला तर त्याला ट्रॅक्शनही चांगलं मिळतंच. अशावेळी जाहिराती मिळवून कंटेट विकण्यापेक्षा चांगला कंटेट तयार करण्यावर रमीतने भर दिला. रमीनते काही अफलातून व्हिडीओ बनवले, आणि त्याचे व्हिडीओ रातोरात वायरल झाले. वयाच्या अवघ्या 28व्या वर्षी रमीतने एक जबरदस्त कंटेट देणारा प्लॅटफॉर्म तयार केला.

पत्रकारीतेत होणाऱ्या चुका, सत्ताधाऱ्यांकडून घेतले जाणारे चुकीचे निर्णय, खोटे दावे, सत्ताधाऱ्यांसोबत विरोधकांवरही निशाणा साधणारे व्हीडीओ या सगळ्यावर अतिशय प्रभावीपणे बोट ठेवण्याचं काम रमीत सारखा तरुण गेली काही वर्ष सातत्यानं करतो आहे.
रमीत हा काही मोदीविरोधी कंटेट देणारा एकमेव नाही. ध्रूव राठी, स्टारभक्त असेही अनेक पेजेस आहेत. कुणाल कामराही कट्टर मोदीविरोधक असल्याचे आरोप केले जातात. पण या कशाला भीक न घालता, ही सगळी तरुण मंडळी आपलं काम करत चालली आहेत. त्यांनी त्यांच्या या कामाला व्यावसायिक रुप आणण्यातंही ही तरुण मंडळी यशस्वी होताना पाहायला मिळत आहेत.

वाह मोदीजी वाह चे T-Shirt विकत घेण्यासाठी इथे क्लिक करा
चीनवरुन दुटप्पी भूमिका कुणाची आहे? पाहा व्हिडीओ
खरी पत्रकारीता जिवंत आहे की नाही?
कोण खोटारडं आहे?
कुणावर विश्वास ठेवायचा?
जेव्हा वरुण ग्रोवर माध्यमांवर रोखठोक बोलतो

हेही इंटरेस्टिंग आहे...

एक एक करुन अनेक गोष्टी करा. आणि मग एकदा मरा!

एक एक करुन अनेक गोष्टी करा. आणि मग एकदा मरा!

घर खरेदी करणं चांगलं की भाड्यानं राहणं चांगलं?

घर खरेदी करणं चांगलं की भाड्यानं राहणं चांगलं?

जेव्हा सोनाली बेंद्रे राज ठाकरेंसोबत एअरपोर्टवर जाते…

जेव्हा सोनाली बेंद्रे राज ठाकरेंसोबत एअरपोर्टवर जाते…

कुठे गाडी लावू? उबर की ओला? | धंदा एके धंदा

कुठे गाडी लावू? उबर की ओला? | धंदा एके धंदा

No Comment

Leave a Reply