जेव्हा सोनाली बेंद्रे राज ठाकरेंसोबत एअरपोर्टवर जाते…

जेव्हा सोनाली बेंद्रे राज ठाकरेंसोबत एअरपोर्टवर जाते…

1996मध्ये मुंबईत पॉपस्टार मायकल जॅक्सन आला होता. त्यावेळी तो मातोश्रीवरही गेला. इतकंच काय तर त्यानं मातोश्रीतील टॉयलेटमध्ये स्वतःला बंदही करुन घेतलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तेव्हा मायकल जॅक्सनला राज ठाकरेंना 4 कोटी रुपयेही द्यावे लागले होते. असं नेमकं काय झालं होतं?

मुंबई – 1996मध्ये मायकल जॅक्सनच्या एका कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईत होणाऱ्या या कॉन्सर्टसाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. मायकलच्या स्वागता मुंबई विमातळावर जी जोडी आली होती, ती पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं होतं. तेव्हा मुंबई विमानतळावर चक्क राज ठाकरे अभिनेत्री सोनाली बेंद्रेसोबत मायकल जॅक्सनच्या स्वागतासाठी पोहोचले होते. सदरा कुर्ता, त्यावर मोदी जॅकेट असा पेहराव राज ठाकरेंनी केला होता. तर अभिनेत्री सोनाली बेंद्रे चक्क नऊवारी साडी नेसून आणि नाकात नथ घालून मायकल जॅक्सनच्या स्वागताला पोहोचली होती. नेहमीसारखेच त्यावेळीही राज ठाकरेंच्या मागे मीडियाचे कॅमेरे फिरत होते. अनेक फोटोग्राफर राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रेला एकत्र कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी तिथे हजर होते. राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रेनेही विमानतळावर फोटोग्राफर्सला झकास पोझ दिल्या होत्या. यावेळी गुलाबी झालेल्या राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे यांचे चेहरे फोटोग्राफर्सने अचूक टिपले.

टॉयलेटमध्येच ऑटोग्राफ

थोड्याच वेळात विमानतळावर मायकल जॅक्सनचं जोरदार स्वागत राज ठाकरेंनी केलं. मराठमोठ्या पद्धतीप्रमाणे फुलांचा हार गळ्यात घालून त्यांचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर मायकल जॅक्सन मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरेंना भेटायला गेला. या भेटीत एक खास किस्सा घडला. मातोश्रीवर मायकल बराच ठेवला होता. यावेळी मायकल मातोश्रीच्या टॉयलेटमध्ये गेला आणि त्याने तिथेच स्वतःला कोंडूनही घेतलं. त्यानंतर टॉयलेटमध्येच मायकल जॅक्सनने बाळासाहेबांना ऑटोग्राफ दिला होता. यानंतर बाळासाहेबांनी मायकल जॅक्सनला चांदीचा तबला आणि तानपुरा भेट दिला होता.

4 कोटी का दिले?

1996 साली राज ठाकरेंकडे शिवसेनेच्या शिवउद्योगाची जबाबदारी होती. त्यासाठी त्यांनी एका कॉन्सर्टचं आयोजन केलं होतं. महाराष्ट्रातील 27 लाख तरुणांना नोकरी मिळावी, या उद्देशानं राज ठाकरेंनी कॉन्सर्टचं आयोजन केलं होतं. या कॉन्सर्टनंतर मायकल जॅक्सननं राज ठाकरेंना त्याकाळी तब्बल 4 कोटी रुपये दिले होते. खरंतर 4 कोटी रुपये देण्यासाठी मायकल जॅक्सन तयार नव्हता. या कॉन्सर्ट बद्दल मायकल जॅक्सनने आपल्या मॅनेजरला विचारणा केली. कॉन्सर्टसाठी येणारे 27 लाख तरुण माझे फॅन्स आहेत का, असा प्रश्न मायकलने मॅनेजरला केला होता. तेव्हा मॅनेजरने दिलेलं उत्तर भारी होतं. मॅनेजर म्हणाला, की ते 27 लाख तरुण अजूनतरी तुमचे चाहते नाहीत, पण तुम्ही मदत केली तर ते नक्की तुमच्या प्रेमात पडतील. मॅनेजरच्या या उत्तरानंतर मायकल जॅक्सन राज ठाकरेंनी 4 कोटी रुपये द्यायला तयार झाला होता.

हेही इंटरेस्टिंग आहे...

एक एक करुन अनेक गोष्टी करा. आणि मग एकदा मरा!

एक एक करुन अनेक गोष्टी करा. आणि मग एकदा मरा!

खूप श्रीमंत.. खूप खूप श्रीमंत.. आणि मग येतात नाना शंकरशेठ

खूप श्रीमंत.. खूप खूप श्रीमंत.. आणि मग येतात नाना शंकरशेठ

भाऊ तोरसेकर… प्रतिपक्ष की पक्षपाती?

भाऊ तोरसेकर… प्रतिपक्ष की पक्षपाती?

‘कोरोनामुक्त झालो, पण प्रवास सोप्पा मुळीच नव्हता’ | भाग 02

‘कोरोनामुक्त झालो, पण प्रवास सोप्पा मुळीच नव्हता’ | भाग 02

No Comment

Leave a Reply