एक एक करुन अनेक गोष्टी करा. आणि मग एकदा मरा!

एक एक करुन अनेक गोष्टी करा. आणि मग एकदा मरा!

डोंबिवली फास्ट सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या निशिकात कामत यांच्या दिग्दर्शनाचं कौतुक करावं तितकं थोडंय. डोंबिवली फास्ट या सिनेमात माधव आपटेच्या भूमिकेतून सर्वसामान्य माणसाची घुसमट समोर आणणारा, हा मोनोलॉग…

अंगणवावर पुरेना म्हणून नोकरी धंदे सुरु झाले. नोकरीत पगार पुरेना. धंद्यात नफा मिळेना. मग तो मिळवणं सुरु झालं.

पगावाढीसाठी संप, दमदाट्या, मोर्चे. नफा वाढवण्यासाठी खोटेपणा चिरीमिरी चोरी.
छान लिहायचो. चित्र काढायचो. पण मग पैसे हवेत. स्थिरता म्हणून बँकेत. बीकॉम पर्यंत एवढा शिकलो, एवढं वाचलं, पण…काय? तर लेजर भरा. परिपत्रके लिहा.


जेवढा न्हालो आधी… तेवढाच कोरडा होत गेलो नंतर. थेंब सुद्धा उरला नाही ओलाव्याचा दाखवायला.

एका रेषेत उभे राहा. एका रेषेत लिहा. एका दमात पदवी मिळवा. एका वर्षात कायम व्हा. एका इच्छेसाठी लग्न करा. आणि ती दुहेरी करण्यासाठी मुलं जन्माला घाला. एक एक करुन अनेक गोष्टी करा. आणि मग एकदा मरा!

म्हणजे एकाकडून एकीकडे एकटं यायचं, एकटं जायचं. आणि मध्ये हा साला जीवघेणा प्रवास. साला अरे मग हा प्रवास सरळ नको का? मनासारखा नको का?

अरे ठरवलंय ना सगळ्यांनी की नियम करायचे. पाळायचे. मग मोडायची घाई का?

सगळ्यांनी मिळून खायचं का सगळ्यांचं आपणच खायचं? ठरवा.. शिस्त नको. मग बेशिस्त व्हा. लाज सोडायची तर मग सगळ्यांनीच सोडा. एकट्यानेच कशाला? एकट्यालाच कशाला ते ओझं?

जगा आणि जगू द्या, हा जर नियम नको असेल तर मग सगळ्यांनी मिळून ठराव करा. म्हणा मारू आणि मारुया. सगळ्यांना मारु. संपवून टाकुया सगळं. आणि सांगून टाकू त्या विधात्याला नाही आवडला तुझा हा खेळ. नाही आवडला तुझा खेळ.

I undersign Madhav Apte, making this declaration that due to my own philosophies I am not eligible to live on this planet. So please take away my services. And I don’t expect any payment from you. I don’t. In fact would like give all dues on my accountability.

So please, lord, god, I am enclosing my body with my soul intact with this declaration. So please accept this & re leave me at the earliest. Please!

Thanking you yours faithfully.

निशिकांत कामत यांनी लेखन, दिग्दर्शनासोबतच अभिनयातही आपली छाप सोडली होती. त्यांच्या कामाचा अल्पपरिचय –

– दिग्दर्शित केलेले सिनेमे –
डोंबिवली फास्ट (मराठी आणि तामिळ)
मुंबई मेरी जान
फोर्स
दृश्यम
मदारी

लेखन –
डोंबिवली फास्ट (पटकथा)
ज्यूली (पटकथा)
सातच्या आत घरात (पटकथा)
मि. व्हाईट मि. ब्लॅक (पटकथा-संवाद)

– अभिनय –
भावेश जोशी सुपरहिरो
ज्यूली
फुगे
रॉकी हॅन्डसम
बावरा मन (शॉर्ट फिल्म)
मुंबई मेरी जान
डोंबिवली फास्ट
सातच्या आत घरात
हवा आने दे

हेही इंटरेस्टिंग आहे...

जेव्हा सोनाली बेंद्रे राज ठाकरेंसोबत एअरपोर्टवर जाते…

जेव्हा सोनाली बेंद्रे राज ठाकरेंसोबत एअरपोर्टवर जाते…

भाऊ तोरसेकर… प्रतिपक्ष की पक्षपाती?

भाऊ तोरसेकर… प्रतिपक्ष की पक्षपाती?

चव्हाण ते ठाकरे! कुणीकुणी भूषवलं महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद?

चव्हाण ते ठाकरे! कुणीकुणी भूषवलं महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद?

‘बोली से नहीं मानेगा तो गोली से मान ही जाएगा’

‘बोली से नहीं मानेगा तो गोली से मान ही जाएगा’

No Comment

Leave a Reply