‘बोली से नहीं मानेगा तो गोली से मान ही जाएगा’

‘बोली से नहीं मानेगा तो गोली से मान ही जाएगा’

कुख्यात गँगस्टर विकास दुबे. 8 पोलिसांना मारणारा गँगस्टर विकास दुबेचा एन्काऊंटर झाला. पण त्याच्या एन्कारऊंटरची भविष्यवाणी एका माणसाने आधीच केली होती. महत्त्वाचं म्हणजे एन्काऊंटरमध्ये मारल्या गेलेल्या विकास दुबेसोबत अनेक अनुत्तरीत प्रश्नही मारले गेले आहेत.

टीम रिडर – अनिल जैन नावाचा एक माणूस आहे. फेसबूकवर प्रोफाईल शोधा लगेच मिळेल. नाहीच मिळाली तर पुढे इंदौर किंवा न्यू दिल्ली असं टाका. हा तो माणूस आहे, ज्याने विकास दुबेचा एन्काऊंटर कसा होईल, याची भविष्यवाणी केली होती. अनिल जैन यांनी लिहीलं होतं की…

दुर्दांत आतंकवादी विकास दुबे उज्जैन के महाकाल मंदिर में पुलिस के सामने आज ‘सुरेन्दर’ हो गया।
अब उत्तर प्रदेश की पुलिस आकर उसे ले जाएगी। वह रास्ते में ‘भागने की कोशिश’ करेगा और इसी कोशिश में पुलिस के हाथों मारा जाएगा।
इस प्रकार उसके तमाम राजनीतिक आका बचे रहेंगे और उनके पापों पर पर्दा पड़ा रहेगा।

विकास दुबेला पकडल्यानंतरच्या अवघ्या काही मिनिटांत ही पोस्ट फेसबूकवर आली होती. म्हणजे 9 जुलै रोजी सकाळी 10 वाजून 52 मिनिटांनी. काय होईल, याची शक्यता वर्तवण्यात आली होती आणि जे भविष्य वर्तवण्यात आलं होतं, नेमकी तशीच घटना घडली आहे. अनिल जैन जोतिषी नाहीत आणि देवही नाहीत. पण सध्या आपल्या आजूबाजूची व्यवस्थी इतकी प्रेटीक्टेबल झाली आहे, की घटनेचे पडसाद नेमके काय, कसे आणि कधी उमटतील, याचा अचूक अंदाज थोड्याशा निरीक्षणातून लगेच करता येतो. अनिल जैन यांनीही तेच केलं आहे.

दुर्दांत आतंकवादी विकास दुबे उज्जैन के महाकाल मंदिर में पुलिस के सामने आज 'सुरेन्दर’ हो गया।अब उत्तर प्रदेश की पुलिस…

अनिल जैन यांनी वर पोस्ट केले बुधवार, ८ जुलै, २०२०


तारीख 10 जुलै. वेळ सकाळी सात साडेसातची. पहिल्यांदा बातमी येते की गँगस्टर विकास दुबेला कानपूरला नेण्यात येत आहे. त्याला कोर्टात हजर करण्यात येणार.

थोड्यावेळानंतर बातमी येते, विकास दुबेला घेऊन जाणाऱ्या स्पेशल टास्क फोर्सच्या गाडीचा अपघात झाला आहे. एक दोन मिनिटांच्या फरकानं पुन्हा अपडेट येतं, की विकास दुबे ज्या गाडीत होता, त्याच गाडीला अपघात झाला असून त्याच्या डोक्याला मार लागला आहे. जखमी विकास दुबेसहीत दोन पोलिस कर्मचारीही जखमी आहे. त्यांनाही रुग्णालयात दाखल केलं जातंय.

ही बातमी लिहून पूर्ण झालेलीली नसते, की तितक्यात सूत्रांच्या हवाल्याने आणखी एक बातमी येते. विकास दुबेचा एन्काऊंटर झाला. एन्काऊंटरमध्ये विकास दुबे मारला गेला. हा सगळा घटनाक्रम चक्रावून टाकणारा असतो. यामुळे एकच खळबळ उडते. ९ जुलैला सरेंडर केलेल्या विकास दुबेचा 24 तासांच्या आतच 10 जुलैच्या सकाळी एन्काऊंटर होतो. त्यात तो मरतो. आणि त्याच्यासोबतच अनेक प्रश्नही अनुत्तरीतच राहतात.

उत्तर प्रदेशात 8 पोलिसांचं हत्याकांड घडवून आणणाऱ्या क्रूरक्रर्मा विकास दुबेला कानपूरमध्ये आणलं जाणार होतं. उत्तर प्रदेश पोलिसांची स्पेशल टास्क फोर्सची टीम विकास दुबेला मध्य प्रदेशातून कानपूरला आणायला रवानाही झाली होती. अनेक दिवसांपासून फरार असलेल्या विकास दुबेला 9 जुलै रोजी उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिर परिसरातून ताब्यात घेण्यात आलं होतं. 2 जुलैला झालेल्या हत्याकांडाच्या घटनेपासून विकास दुबे पोलिसांना चकवा देत लपून बसला होता.

दरम्यान एन्काउंटर होण्याआधी जो अपघात झाला, त्यावरही संशयाची सुई ठेवली जात आहे. स्पेशल टास्क फोर्स विकास दुबेला कानपूरला आणत असताना त्यांच्या ताफ्याच्या 20 किलोमीटर पुढे आणि मागे कुणालाही यायला-जायला परवानगी देण्यात आली नव्हती. त्यामुळेच नेमकं घटनास्थळी काय घडलं, याचं गूढ कायम आहे.

एन्काउंटर करण्याची वेळ का आली? बातम्या नेमकं काय सांगतात?

कानपूरमधील पोलिसांच्या हत्येप्रकरणात विकास दुबे हा प्रमुख आरोपी होता. त्यानं सरेंडर केलं होतं. उज्जैन हून त्याला कानपूरलं आणलं जात होतं. त्यावेळी हा सगळा थरारक प्रकार घडलाय. विकास दुबेला कानपूर कोर्टात हजर केलं जाणार होतं. मात्र उज्जेनहून त्याला कानपूरला आणतेवेळी स्पेशल टास्क फोर्सच्या ताफ्यातील एका गाडीचा अपघात झाला.
यानंतर विकास दुबे याने पोलिसांचं शस्त्र घेऊन गोळीबार करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी विकास दुबेला आत्मसमर्पण करण्यास सांगितलं. यादरम्यान झालेल्या चकमकीत पोलिसांनी विकास दुबेला ठार केलं.

एन्काउंटरनंतर त्याचा मृतदेह लाला लजपतराय रुग्णालयात आणण्यात आला. या अपघातात दोन पोलिसदेखील गंभीर जखमी झालेत. 8 पोलिसांचं हत्याकांड केल्यानंतर फरार झालेल्या विकास दुबेचा पोलिस आठवड्याभरापासून शोध सुरू होता. त्याच्यावर पाच लाखांचं बक्षीसदेखील जाहीर करण्यात आलं होतं.

नेमकं कधी काय काय घडलं?

– 2 आणि 3 जुलैच्या मध्यरात्री विकासला पकडण्यासाठी पोलिस पोहोचले
– पोलिसांनी कारवाई करण्याआधीच विकासचा पोलिसांवर गोळीबार
– कानपूरच्या चौबेपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एकच खळबळ
– विकास दुबेच्या गोळीबारात 8 पोलिस शहीद
– स्पेशल टास्क फोर्सकडून तपासाला सुरुवात
– विकास दुबेचा शोधण्यासाठी विशेष ऑपरेशन
– पोलिसांपैकीच कुणीतरी विकास दुबेला माहिती पुरवत असल्याचा आरोप
– अखेर 9 जुलैला सकाळी विकासला मध्य प्रदेशातून अटक
– अटक केल्याच्या 24 तासांच्या आतच विकास दुबेचा एन्काऊटंर

एन्काउंटरचं राजकारण

‘बोली से नहीं मानेगा तो गोली से मान ही जाएगा’

काँग्रेस आणि समाजवादी पार्टी दोघांनीही विकास दुबेच्या एन्काऊंटरवरुन सवाल उपस्थित केले आहेत. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी सुद्धा ट्वीट केलंय. गुन्हेगाराचा शेवट झाला. पण गुन्हे आणि त्यांना संरक्षण देणाऱ्याचे काय? असा सवाल प्रियंका गांधी यांनी उपस्थित केला आहे. तर विकास दुबेचे अनेक राजकीय नेत्यांशी संबंध असल्याचं जगजाहीर होतं. यालाच अधोरेखित करताना उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ‘ही गाडी उलटली नाही तर अनेक गुपितं उघड होण्याच्या भीतीनं वाचवण्यात आलीय’ असं ट्विट विकास दुबेच्या एन्काऊन्टर संदर्भात केलंय. शुक्रवारीही ‘विकास दुबेच्या मोबाइलचा सीडीआर सार्वजनिक करा जेणेकरूण त्याचे कोणाशी संबंध होते, त्याला कोण मदत करत होते हे उघड होईल’ अशी मागणी त्यांनी ट्विटरवर केली होती.

जर-तरच्या गोष्टची

विकास दुबे कानपूर कोर्टात पोहोचला असता, तर काय त्याने राजकीय आश्रितांची नावं समोर आणली असती? त्यामुळे कोणाला नुकसान झालं असतं?

८ पोलिसांना मारणाऱ्या विकास दुबेलाही त्याच्याप्रमाणेच पोलिसांनी ठार मारलं. मग पोलिस आणि गँगस्टर यांच्या फरक काय?

लॉकडाऊन असताना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात विकास दुबे पोहचलाच कसा? त्याला कुणी मदत केली?

जर एन्काऊंटरनेच न्याय केला जाणार असेल तर मग आपल्या देशा न्याय-व्यवस्थेची गरजच काय उरली आहे?

विकास दुबेच्या मारले जाण्याने सगळ्यात जास्त फायदा कुणाला होणार आहे?

अतिरेकी विकास दुबेच्या मरण्याने अनेक प्रश्नही मारून टाकले आहेत. ज्याची उत्तरं विकास दुबेच देऊ शकला असता. त्यासाठी त्याला कानपूर कोर्टात पोहोचणं आवश्यक होतं. पण पोलिसांनी त्याला यमसदनीच धाडलंय. एखाद्या सिनेमालाही लाजवेल असा हा सगळा घटनाक्रम आहे. यात एक भलंमोठं प्रश्नचिन्ह व्यवस्थेवर उभं राहिलंय

गँगस्टर तर आजही अनेक आहेत. पण त्यांचाही एन्ककाऊंटर पोलिस का करत नाही? सांगत आहेत शम्स साहिर खान

हेही इंटरेस्टिंग आहे...

एक एक करुन अनेक गोष्टी करा. आणि मग एकदा मरा!

एक एक करुन अनेक गोष्टी करा. आणि मग एकदा मरा!

जेव्हा सोनाली बेंद्रे राज ठाकरेंसोबत एअरपोर्टवर जाते…

जेव्हा सोनाली बेंद्रे राज ठाकरेंसोबत एअरपोर्टवर जाते…

भाऊ तोरसेकर… प्रतिपक्ष की पक्षपाती?

भाऊ तोरसेकर… प्रतिपक्ष की पक्षपाती?

चव्हाण ते ठाकरे! कुणीकुणी भूषवलं महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद?

चव्हाण ते ठाकरे! कुणीकुणी भूषवलं महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद?

No Comment

Leave a Reply