चव्हाण ते ठाकरे! कुणीकुणी भूषवलं महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद?

चव्हाण ते ठाकरे! कुणीकुणी भूषवलं महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद?

1960 साली महाराष्ट्राची स्थापना झाली. त्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी पहिल्यांदा विराजमान झाले, ते यशवंतराव चव्हाण. पण भारत तर 1947 सालीच स्वतंत्र झाला होता. मग महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री 1960 साली का आले?

भारत स्वतंत्र झाला, तेव्हा बॉम्बे राज्य होतं. 15 ऑगस्ट पासून 1 मे 1960पर्यंत असणाऱ्या बॉम्बे राज्यात महाराष्ट्राचा आताचा भाग आणि गुजरात असा एकत्रित भाग व्यापलेला होता. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्यावेळी गुजराही महाराष्ट्रापासून वेगळा झाला. बॉम्बेची मुंबई झाली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी अनेकांनी लढा दिली. शंभरहून अधिक हुतात्म्यांच्या बलिदानानंतर महाराष्ट्र अस्तित्वात आला.

संयुक्त महाराष्ट्रासाठी करण्यात आलेल्या आंदोलनानंतर स्वतंत्र महाराष्ट्र राज्य स्थापन झालं. या राज्याला दैदीप्यमान इतिहास आहे. वैभवशाली परंपरा आहे. तसंच राजकीय पार्श्वभूमीदेखील आहेच. या महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत अनेक मुख्यमंत्री होऊन गेले. कुणी किती वर्ष, किती दिवस मुख्यमंत्री पद गाजवलं, त्याचा हा आढावा…

महाराष्ट्र राज्य होण्याआधी बॉम्बेचे मुख्यमंत्री कोण होते?

1 बाळासाहेब गंगाधर खेर – काँग्रेस
15. 08. 1947 -21. 08. 1952 (1711 दिवस)

2 मोरारजी देसाई – काँग्रेस
21. 04. 1952 – 31. 11. 1956 (1654 दिवस)

3 यशवंतराव चव्हाण – काँग्रेस
1. 11. 1956 – 5. 04. 1957, 5. 04. 1956 – 30. 04. 1960 (1307 दिवस)

महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्रिपद कुणीकुणी भूषवलं?

1 यशवंतराव चव्हाण – काँग्रेस
1 .05. 1960- 19. 11. 1962 (933 दिवस)

2 मारोतराव कन्नमावर – काँग्रेस

20.11. 1962- 24 .11. 1963 (370 दिवस)

3 पी. के. सावंत – काँग्रेस

25. 11. 1963- 4. 12. 1963 (10 दिवस)

4 वसंतराव नाईक – काँग्रेस

5. 12. 1963- 20. 02. 1975 (4097 दिवस)

5 शंकरराव चव्हाण – काँग्रेस

21. 02. 1975 – 16. 05. 1977 (816 दिवस)

6 वसंतदादा पाटील – काँग्रेस

17. 05. 1977 – 18. 07. 1978 (427 दिवस)

7 शरद पवार – पुलोद

18. 07. 1978 – 17. 02. 1980 (580 दिवस)

8 अब्दुल रहमान अन्तुले – काँग्रेस

9. 06. 1980 – 12. 01. 1982 (583 दिवस)

9 बाबासाहेब भोसले – काँग्रेस

21. 01. 1982 – 1. 02. 1983 (377 दिवस)

10 वसंतदादा पाटील – काँग्रेस

2. 02. 1983 – 1. 06. 1985 (851 दिवस)

11 शिवाजीराव पाटील निलंगेकर – काँग्रेस

3. 06. 1985 – 6. 03. 1986 (277 दिवस)

12 शंकरराव चव्हाण – काँग्रेस

12. 03. 1986- 26. 06. 1988 (837 दिवस)

13 शरद पवार – काँग्रेस

26. 06. 1988 – 25. 06. 1991 (1094 दिवस)

14 सुधाकरराव नाईक – काँग्रेस

25. 06. 1991 – 22. 02. 1993 (608 दिवस)

15 शरद पवार – काँग्रेस

6. 06. 1993 – 14. 03. 1995 (739 दिवस)

16 मनोहर जोशी – शिवसेना

14. 06. 1995 – 31. 01. 1999 (1419 दिवस)

17 नारायण राणे – शिवसेना

1. 02. 1999 – 17. 10. 1999 (259 दिवस)

18 विलासराव देशमुख- काँग्रेस

18. 10. 1999 – 16. 01. 2003 (1187 दिवस)

19 सुशील कुमार शिंदे – काँग्रेस

18. 01. 2003 – 30. 10. 2004 (651 दिवस)

20 विलासदाव देशमुख – काँग्रेस

1. 11. 2004 – 4. 12. 2008 (1494 दिवस)

21 अशोक चव्हाण – काँग्रेस

8. 12. 2008 – 15. 10. 2009
7. 11. 2009 – 9. 11. 2010 (679 दिवस)

22 पृथ्वीराज चव्हाण – काँग्रेस

11. 11. 2010 – 29. 9. 2014 (1415 दिवस)

23 देवेंद्र फडणवीस – भाजप

31. 10. 2014 – 31. 10. 2019,
23 .11. 2019 – 26. 11. 2019

24 उद्धव ठाकरे – शिवसेना

28. 11. 2019 – वर्तमान

हेही इंटरेस्टिंग आहे...

एक एक करुन अनेक गोष्टी करा. आणि मग एकदा मरा!

एक एक करुन अनेक गोष्टी करा. आणि मग एकदा मरा!

जेव्हा सोनाली बेंद्रे राज ठाकरेंसोबत एअरपोर्टवर जाते…

जेव्हा सोनाली बेंद्रे राज ठाकरेंसोबत एअरपोर्टवर जाते…

भाऊ तोरसेकर… प्रतिपक्ष की पक्षपाती?

भाऊ तोरसेकर… प्रतिपक्ष की पक्षपाती?

‘बोली से नहीं मानेगा तो गोली से मान ही जाएगा’

‘बोली से नहीं मानेगा तो गोली से मान ही जाएगा’

No Comment

Leave a Reply