2 वर्षांचा असताना वडील गेले, पेन्शनवर शिकला, आज करोडोत खेळतोय

2 वर्षांचा असताना वडील गेले, पेन्शनवर शिकला, आज करोडोत खेळतोय

पुठ्ठ्यावर असणारा हा साधासा खेळ स्मार्ट फोन मध्ये आला आणि छोट्यांपासून मोठ्यांना पुन्हा एकदा या खेळानं आपल्या प्रेमात पाडलंच. लुडो कसा खेळायचा हे तुम्हाला माहीत आहेच. पण स्मार्टफोनमध्ये हा खेळ घेऊन येणाऱ्या अवलियाबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

मुक्ता परब – लहानपणी लुडो खेळला नसेल, असा व्यक्ती क्वचितच सापडेल. साप शिडी असेल किंवा चौघांनी मिळून खेळायचा लुडो. लहानपणी प्रत्येकजण लुडो खेळण्याच्या प्रेमात पडतोच. मोठं झाल्यावर लुडो खेळण्याचं प्रेम कमी होतं अशातला मुळीच भाग नाही. अजूनही अनेकदा लोकलमध्ये, बसमध्ये, एसटीत, वर्गात, ऑफिसात जिथे वेळ मिळेत तिथे लोकं स्मार्टफोनवर लुडो खेळण्यात दंग झाल्याचं पाहायला मिळतं. पुठ्ठ्यावर असणारा हा साधासा खेळ स्मार्ट फोन मध्ये आला आणि छोट्यांपासून मोठ्यांना पुन्हा एकदा या खेळानं आपल्या प्रेमात पाडलंच. लुडो कसा खेळायचा हे तुम्हाला माहीत आहेच. पण स्मार्टफोनमध्ये हा खेळ घेऊन येणाऱ्या अवलियाबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

विकाश जायस्वाल. लुडो स्मार्ट फोनमध्ये घेऊन जाणारा विकाश. स नाही श. वि का श. विकाश जयस्वाल मूळचे पाटण्याचे. 1991 साली किशोरवयीन विकाशला व्हिडीओ गेम खेळण्याचं वेड लागलं होतं. व्हिडीओ गेमचा नाद असणारा विकाश 17 वर्षांचा होता. तेव्हा पाटण्यातील प्रशासनाने व्हिडीओ गेमिंग पार्लर बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी 17 वर्षांच्या विकाश जयस्वालची एकच इच्छा होती. एक व्हिडीओ गेमची मशिन घ्यायची आणि दिवसभर फक्त खेळत राहायचं.

विकाश जयस्वाल आपल्या चाळीशीत नवी मुंबईत असलेल्या गैमेटियन टेक्नोलॉजीजचे सर्वेसर्वा आहेत. त्यांनी तयार केलेलं लुडो किंग हा गेम कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जगभरात चर्चिलं जातंय. घरात असलेल्या लोकांना लुडो किंगनं मोठा आधार दिलाय. टाईमपास करण्याच्या नादात अनेक लोक आता चक्क वेळ काढून लुडो किंग खेळत असल्याचे किस्से तुमच्याही आजूबाजूला दिसतील.

एन्ड्रॉईड आणि आय-ओएस (एपल फोनमध्ये) या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टममध्ये लुडो किंग भारतातील नंबर वन गेमिंग ऍपपैकी एक आहे.

विकाश जयस्वाल

कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या आधी लुडो किंगचं ट्रॅफिक साधारण 13 ते 15 मिलियन DAU (डेली एक्टीव युजर्स) आणि 60 ते 63 मिलियन MAU (मन्थली एक्टीव यूजर्स) होते. पण लॉकडाऊननंतर यात चौपट वाढ झाली आहे. आता लुडो किंगवर डेली एक्टीव युजर्सचा आकडाच 50 मिलियनच्या पार गेलाय. तर मन्थली एक्टीव यूजर्स 185 पेक्षा जास्त आहेत. हे आकडे दिवसेंदिवस वाढत चाललेत.

लुडो खरं तर प्राचीन काळात भारतीय राजे, महाराजे यांच्यात खेळला जाणारा एक खेळ. पण या खेळाची लोकप्रियता अजूनही कायम आहे, हे वरील आकड्यांवरुन स्पष्ट होतं. लुडो किंगने आणखी एक रेकॉर्ड केलाय. मन्थली एक्टीव यूजर्सच्या तुलनेत लुडो किंगने कॅन्डी क्रश, पबजी, क्लॅश ऑफ क्लॅन्स, सबवे सर्फर, टेन्पल रन यासारख्या गेम्सला केव्हाच ओव्हरटेक केलंय.
100 मिलियन डाऊनलोड्स चा विक्रम करण्याचीही कमाल लुडो किंगने केली आहे. याआधी कोणत्याही भारतीय गेमला 100 मिलिअन डाऊनलोड्सचा आकडा पार करता आला नव्हता, असं विकाश जायस्वाल यांनी म्हटलंय. सध्या 350 मिलिअनपेक्षा जास्त डाऊनलोड्स असणारा लुडो किंग हा एकमात्र भारतीय गेम प्लेस्टोर आणि ऍपस्टोर वर आहे.

Record-Break Downloads

सुरुवात कुठून झाली?

विकाश एका सर्वसामान्य कुटुंबात लहानाचे मोठे झाले. 2 वर्षांचे असताना त्यांच्या वडीलांचं निधन झालं. त्यावेळी वडिलांच्या पेन्शनवरच जायस्वाल कुटुंबाचं घर चाललं. विकाश यांना एक मोठा भाऊही आहे. लहानपणी त्यांना कुणीतरी विचारलं की मोठं होऊन तुला काय बनायचंय?, तेव्हा विकास यांनी सांगितलेलं उत्तर खूपच भारी होतं. ते म्हणायचे..

”मला श्रीमंत व्हायचंय…!

जसजसे ते मोठे होत गेले तसतसं त्यांना लक्षात आलं की आयटी इंजिनिअर चांगली कमाई करतो. म्हणून त्यांनी कम्प्यूटर इंजिनिअरींग करायचं ठरवलं. विकाश पहिल्यापासूनच क्रिएटीव्ह आणि टेक्निकल कौशल्यानं परिपूर्ण होते. इंजिनिअरींगच्या एन्टरन्सची तयारी करताना विकाश ग्रीटिंग कार्ट बनावयचे. त्याचं डिझाईन, कटिंग सगळं ते स्वतःच करायचे. एका स्टेशनरीच्या दुकानात आपण बनवलेले हॅन्डमेड ग्रिटींग कार्ड ते विकायला देत असत.

कम्प्युटर इंजिनिअरिंगला प्रवेश मिळायला विकाश यांना काही वर्ष लागली. त्यादरम्यान, त्यांनी पाटण्यातच एनिमेशन, ग्राफिक डिझाईन आणि थ्री डीचा कोर्स केला. 1999 साली उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमधील एका कॉलेजातून त्यानंतर कम्प्युटर इंजिनिअरींगचं शिक्षण घेतलं. त्याकाळी कम्प्युटर विकत घेणं हे विकाश आणि त्यांच्या घरातल्यांसाठी मोठं आव्हानात्मक होतं. पण आपल्या मोठ्या भावाचं आणि आईचं मन जिंकून त्यांनी कम्प्युटर खरेदी केला.

ज्यावेळी विकाश यांच्यासोबतची मुलं पीसीवर गाणी ऐकणं, सिनेमे पाहणं अशा गोष्टी करत होते, तेव्हा विकाश नेहमी कॉम्प्युटरवर कसलातरी अभ्यास करत बसलेले असायचे.
फुकट मिळणारे कॉम्प्युटर सॉफ्टवेअर शोधून त्यावर ते कसलं-बसलं काम करत बसायचे. कॉम्प्युटरबाबत ए-टू-झेड माहिती असणाऱ्या प्रश्नांची सर्व उत्तरं देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये विकाश जयस्वाल यांचं नाव हॉस्टेलमध्ये घेतलं जाऊ लागलं.

लोकलमध्ये लुडो किंग खेळताना

स्वप्न सत्यात उतरवण्याचं ध्येय

एकदा असंच विकाश यांना फ्री गेमिंग सॉफ्टवेअर मिळालं. त्यातून त्यांना आपल्या लहानपणीच्या स्वप्नांना उजाळा दिला. गेमिंगबद्दल असणारं वेड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं. रातोरात त्यांनी एक गेम डेव्हलप केला. या गेमचं नाव एग्गी बॉय. या गेमला अनेक ठिकाणी पुरस्कारही मिळालेत. विकाश ज्या हॉस्टेलमध्ये राहत होते, तिथली मुलही हा गेम खेळू लागली.

इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असताना विकाश यांनी एक दिवस दांडी मारली. दांडी मारुन विकाश 20 किलोमीटर दूर एका सायबर कॅफेमध्ये गेले. १ तासासाठी इंटरनेट वापरायला तेव्हा त्यांना १०० रुपये खर्च आला होता.

एग्गी बॉयनंतर विकाश यांना एका गेमिंग कंपनीत काम करायचं होतं. त्यासाठी त्यांनी सायबर कॅफेमधून वेगवेगळ्या गेमिंग कंपन्यांना आपला सीव्ही मेल केला. 2004 साली त्यांना अखेर संधी मिळाली. मुंबईत असलेल्या इंडियागेम्स या कंपनीत त्यांना नोकरी लागली. विशाल गोंडल यांनी सुरु केलेल्या इंडियागेम्समध्ये ते काम करु लागले. कालांतराने इंडियागेम्स कंपनी डिज्नीने विकत घेतली. 4 वर्ष त्यांनी गेमिंग कंपनीत काम केलं.

पण लहानपणीचं वाक्य त्यांना आठवत होतं. त्यांना श्रीमंत बनायचं होतं. उद्योजक बनायचं होतं. गुगल ऍडसेन्स ही त्याकाळी आलेली एक नवीनच गोष्ट होती. त्यावेळी पैसे कमावण्यासाठी विकाश गेमिंग कंटेट वेबसाईटचं काम करत होते. त्यावर ब्लॉग आणि गेमिंग कंटेट विकाश पोस्ट करत होते.

ज्यावेळी यातून बऱ्यापैकी पैसे मिळू लागले, तेव्हा विकाश यांनी आपली नोकरी सोडण्याचं ठरवलं आणि बिझनेस करण्याचा निश्चय केला. आणखी एक वर्ष नोकरी केली, तर ग्रॅच्युटी मिळेल, असा सल्ला लोकांनी तेव्हा दिल्याचं विकाश हसत हसत सांगतात. पण त्यांनी चौथ्या वर्षी नोकरी सोडली आणि स्वतंत्रपणे गेम आणि वेबसाईट सुरु करण्याचं काम हाती घेतलं.

लुडो किंगचा जन्म कसा झाला?

साल होतं 2010. विकाश यांनी 2 लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून गैमेटियन नावाची कंपनी सुरु केली. मुंबईतल्या खारमध्ये त्यांनी एक छोटसं ऑफिस थाटलं. ज्यात काही कम्प्युटर आणि दोन जण कामाला होते.

विकाश जयस्वास युवरस्टोरीशी बोलताना सांगतात, की…
त्यावेळी माझं लक्ष्य हे पैसै कमावण्याकडे अधिक होतं. त्यासाठी इंजिनिअर्स आणि ग्राफिक डिझायर्न्स यांच्या मदतीनमुळे गेम बनवणं आणि विकण्यामध्ये मोठी मदत झाली.

2013 साली विकाश यांच्या मनात एक कल्पना आली. स्मार्ट फोन्सची विक्री तेव्हा रोज नवनवे विक्रत करत होती. हे लक्षात घेता त्यांनी मोबाईल गेममध्ये पाऊल टाकायचं ठरवलं. यातूनच लुडो किंगचा विचार त्यांच्या मनात सगळ्यात आधी रुजला.

विकाश यांना पकडून फक्त ३ लोक लुडो किंग या गेमवर काम करत होते. त्यात त्यांच्या डिझायनरने तर त्याच्या आयुष्यात कधी लुडो खेळलाच नव्हता. त्यामुळे विकाश यांनी स्वतः स्क्रॅच पासून हा गेम डेव्हलप केला.

वेळेचं मूल्य, सोपे नियम आणि क्विक एक्शन हे लुडो किंग डेव्हलप करताना विकाश यांनी डोक्यात ठेवलं. वेगवेगळ्या ठिकाणी खेळण्यात येणाऱ्या लुडो किंगचे नियम वेगवेगळे आहेत, असं विकाश सांगतात. पण गेम बनवताना त्यांनी सोप्पा आणि वेगवान गेम बनवायचा होता.
2016मध्ये लुडो किंग लॉन्च झाला. तेव्हापासून हा गेम मोस्ट फेव्हरेट लिस्टमध्ये टॉपला आहे.

भारतातील काही मोजक्या गेमपैकी लुडो किंग हा एकमेव गेम आहे, जो मागच्या काही वर्षांपासून टॉप फेव्हरेट म्हणून गणला जातोय. सेंसट टॉवरने दिलेल्या माहितीनुसार लुडो किंगने एकट्या मार्च महिन्यात 3 लाख डॉलर्सची कमाई केली. विशेष म्हणजे लॉकडाऊनच्या काळात या कमाईत आणखी वाढ झाली.

Team Gametion

मोठेपणाचं लक्षण

आपण मोठेपण जाणवू न देणं, हेच प्रत्येक मोठ्या माणसाचं लक्षण असतं. विकाश जायस्वाल यांच्याबाबतीतही तेच म्हणावं लागेल. आपल्या सगळ्या यशाचं श्रेय ते आपल्या सहकाऱ्यांना देतात. 70 जणांच्या त्यांच्या टीममध्ये त्यांची पत्नी सोनी जयस्वालही आलेत. त्या मॅनेजमेन्ट आणि कॅरम किंग सारखा गेम सुपरवाईज करतात. लुडो किंग एका साधारण खेळ जरी असला, तरी तो तयार करणारा माणूस आणि त्याची स्टोरी असाधारण आहे. यशाची शिखरं गाठण्यासाठी प्रचंड मेहनत, सातत्य आणि प्रामाणिकपणा जोपासावा लागतो, हे विकाश जयस्वाल यांच्याकडून शिकता येण्यासारखं आहे.

हेही वाचा – इन्फोसिसची नोकरी सोडली आणि पाणीपुरी विकून कमाल केली
हेही वाचा – मोदीविरोधी Official PeeingHuman जन्माला कसं आलं?

हेही इंटरेस्टिंग आहे...

वडापाव विकून 300 कोटीचा धंदा करणारा अवलिया

वडापाव विकून 300 कोटीचा धंदा करणारा अवलिया

इन्फोसिसची नोकरी सोडली आणि पाणीपुरी विकून कमाल केली

इन्फोसिसची नोकरी सोडली आणि पाणीपुरी विकून कमाल केली

‘एक वेळ अशीही आली की वाटलं एक्टींग सोडून द्यावी’

‘एक वेळ अशीही आली की वाटलं एक्टींग सोडून द्यावी’

प्रेम नहीं है खेल प्रिये, तू ‘कमळा’परी बेभान प्रिये

प्रेम नहीं है खेल प्रिये, तू ‘कमळा’परी बेभान प्रिये

No Comment

Leave a Reply