इन्फोसिसची नोकरी सोडली आणि पाणीपुरी विकून कमाल केली

इन्फोसिसची नोकरी सोडली आणि पाणीपुरी विकून कमाल केली

पाणीपुरी कुणाला नाही आवडत? प्रशांत कुलकर्णीलाही आवडत होतीच. पाणीपुरी आवडते म्हणून काही प्रत्येकजण पाणीपुरीचं दुकान नाही ना थाटत? पण प्रशांत कुलकर्णींनी थाटलं. का थाटलं त्याची स्टोरीही भन्नाट आहे.

स्नेहल सावंत – चटर-पटर बिझनेस करायचा नाही, असं प्रत्येक व्यावसायिकाला वाटतं. पण प्रशांत कुलकर्णी यांनी तर आपल्या स्टार्टअपच नावचं चटर-पटर ठेवलं. साल होतं 2011. महिना होता ऑक्टोबर. प्रशांत कुलकर्णी यांनी आपल्या पत्नीसोबत मिळून पाणीपुरीला जगात नाव मिळवून देण्यासाठी स्टार्टअप सुरु केलं. चटर-पटर इंदूरमधून सुरु झालं. बघता बघता हा ब्रॅन्ड पोरबंदर, जामनगर, राजकोट, विशाखापट्टणम, राजस्थान आणि आपल्या महाराष्ट्राचही पोहोचला.

भारतातला पहिला पाणीपुरी ब्रॅन्ड

प्रशांत कुलकर्णी खरंतर इन्फोसिसमध्ये काम करत होते. त्यांना पाणीपुरी खायची प्रचंड आवड. पण रस्त्याशेजारी मिळणारी पाणीपुरी आरोग्यासाठी चांगली नसते, अशा अनेक बातम्या पाहतो. अशी रस्त्याशेजारी खाल्लेल्या पाणीपुरीमुळे प्रशांत कुलकर्णी यांची तब्बेत बिघडली. पाणीपुरीमुळे झालेल्या विषबाधेमुळे त्यांना चक्क 4 महिने पाणी पुरी खाता येणार नव्हती. याच दरम्यान, स्ट्रीट फुडचा ब्रॅन्ड तयार करण्याचं प्रशांत कुलकर्णी यांच्या डोक्यात आलं.

स्ट्रीट फूडचा ब्रॅन्ड बनवणं वाटतं तितकं सोप्प नव्हतं. आजारातून बरं झाल्यानंतर प्रशांत कुलकर्णी यांनी स्ट्रीड फूड ब्रॅन्डची कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचं ठरवलं. एमबीए केलेल्या प्रशांत कुलकर्णींनी एन्फोसिसच्या नोकरीचा राजीनामा दिला. आपल्या स्वप्नांचा पाठलाग करण्याचं त्यांचं उद्दीष्ट्य त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं.

घरच्यांचा सपोर्ट नाही

पत्नी आरती कुलकर्णीच्या मदतीने चटर-पटरची सुरवात झाली. जेव्हा कुलकर्णी दाम्पत्यानं आपला निर्णय कुटुंबीयांना सांगितला, तेव्हा सगळ्यांनी त्यांना मुर्खात काढलं. हा बिझनेस चालणार नाही, असाच सगळ्यांचा सूर होता. प्रशांत कुलकर्णी हे स्वतः एका व्यावयिक घरण्यातूनच येतात. ऑटोमोबाईलसाठी ट्यूब्स बनवण्याचा त्यांच्या कुटुंबीयांचा व्यवसाय आहे. मात्र हा व्यवसाय सोडून प्रशांत कुलकर्णींच्या डोक्यात एका वेगळ्याच व्यवसायाची कल्पना डोकावत होती.

त्यांच्या या अनोख्या कल्पनेला घरच्यांनी सर्पोट केला नाही म्हणून कुलकर्णी दाम्पत्य खचलं नाही. पण आर्थिक पाठबळाशिवाय हा बिझनेस चालवणं सोप्प नव्हतं. पण म्हणून कुलकर्णी दाम्पत्यानं हार मानली नाही.

30 हजार ते 80 कोटीचा प्रवास

अवघ्या 30 हजार रुपयांत कुलकर्णी दाम्पत्यानं चटर-पटरची सुरुवात केली. 2018 साली त्यांच्या कंपनीचा टर्नओव्हर 80 कोटीपर्यंत पोहोचला होता. यशाच हे शिखर गाठताना कुलकर्णी दाम्पत्यानं अनेक उतारचढाव पाहिले. सुरुवातीच्या टप्प्यांत त्यांनी देशभर फिरुन स्ट्रीट फूडचा अभ्यास केला. यातून त्यांनी 112 फ्लेवर तयार केले. पाणीपुरीपासून जन्माला आलेल्या कल्पनेतूनच आता अडीचशेपेक्षा जास्त प्रोडक्ट कुलकर्णी दाम्पत्यानं विकसीत केलं. यात बर्गर, पास्ता, चाट-पिझ्झा सारख्या गोष्टींचाही समावेश आहे. सध्या भारतातील मोठ्या शहरांमध्ये चटर-पटरचे शंभरपेक्षा जास्त स्टोअर्स आहेत.

बिझनेस जोमात

युवरस्टोरीशी बोलताना प्रशांत कुलकर्णी यांनी आपल्या भविष्यातील उद्दीष्टांबद्दलच्या भावना बोलून दाखवल्या आहेत. प्रशांत कुलकर्णी म्हणतात…

आम्ही स्वप्न पाहणारी लोकं आहेत. भारतात यशस्वी कामगिरी केल्यानंतर आता आम्हाला चटरपटरला एक आंतरराष्ट्रीय ब्रॅन्ड तयार करायचा आहे. यासाठी ऑस्ट्रेलिया आणि लंडनमध्ये चटर-पटर सुरु करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत.

विविध प्रकारच्या पाणीपुरी
न्यू यॉर्कमध्ये डोसा विकणाऱ्या अवलियाची गोष्ट

हेही इंटरेस्टिंग आहे...

वडापाव विकून 300 कोटीचा धंदा करणारा अवलिया

वडापाव विकून 300 कोटीचा धंदा करणारा अवलिया

2 वर्षांचा असताना वडील गेले, पेन्शनवर शिकला, आज करोडोत खेळतोय

2 वर्षांचा असताना वडील गेले, पेन्शनवर शिकला, आज करोडोत खेळतोय

‘एक वेळ अशीही आली की वाटलं एक्टींग सोडून द्यावी’

‘एक वेळ अशीही आली की वाटलं एक्टींग सोडून द्यावी’

प्रेम नहीं है खेल प्रिये, तू ‘कमळा’परी बेभान प्रिये

प्रेम नहीं है खेल प्रिये, तू ‘कमळा’परी बेभान प्रिये

No Comment

Leave a Reply