लक्षणं नसलेल्या कोरोनाग्रस्तांकडूनही धोका?

लक्षणं नसलेल्या कोरोनाग्रस्तांकडूनही धोका?

काहीही लक्षणं नसलेल्या रुग्णांकडूनही कोरोनाचा प्रसार होऊ शकतो, असा दावा जागतिक कीर्तीच्या संशोधकांनी केला आहे. त्यामुळे कोरोनाची भीती आणखी वाढली आहे.


लक्षणं नसलेल्या कोरोनाग्रस्तांकडूनही धोका आहे का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. काही
आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संशोधकांनी यासंबंधी एक धक्कादायक दावा केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पण खरंच असं होणं शक्य आहे का?

काही दिवसांआधी WHO दावा केला होता की, लक्षणं नसलेले रुग्ण कोरोनाचा प्रसार करत नाहीत. मात्र आता WHO च्या दाव्याला खोटं ठरवणारं संशोधन समोर आलंय. कोरोनाची कुठलीही लक्षणं नसलेले रुग्णही कोरोनाचा प्रसार करू शकतात असा दावा आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक डॉ. रेयान स्टँटन यांनी केलाय.

लक्षणं नसलेल्या रुग्णांकडून कोरोना प्रसार?

कोरोनाची लक्षणं नसलेले रुग्णही कोरोनाचा प्रसार करू शकतात. त्याचसोबत कोरोनाची प्राथमिक लक्षणं असलेले रुग्ण कोरोनाच्या प्रसाराला मोठा हातभार लाऊ शकतात, असाही दावा डॉ. रेयान स्टँटन यांनी केलाय.

फक्त काळजी घेणं आपल्या हातात

कोरोनाच्या जागतिक संकटात मोठ्या प्रमाणात संशोधन होतंय. त्यातच काही दिवसांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेनं लक्षणं नसलेल्या रुग्णांकडून कोरोनाचा प्रसार होत नसल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र डॉ. रेयान स्टँटन यांनी केलेल्या नव्या दाव्याने चिंतेत भर पडलीय. त्यामुळे लक्षणं असू किंवा नसू आणि कोरोना असू किंवा नसू… प्रत्येकानेच आता अधिकची काळजी घ्यायला हवी.

हेही इंटरेस्टिंग आहे...

जेव्हा सोनाली बेंद्रे राज ठाकरेंसोबत एअरपोर्टवर जाते…

जेव्हा सोनाली बेंद्रे राज ठाकरेंसोबत एअरपोर्टवर जाते…

खूप श्रीमंत.. खूप खूप श्रीमंत.. आणि मग येतात नाना शंकरशेठ

खूप श्रीमंत.. खूप खूप श्रीमंत.. आणि मग येतात नाना शंकरशेठ

भाऊ तोरसेकर… प्रतिपक्ष की पक्षपाती?

भाऊ तोरसेकर… प्रतिपक्ष की पक्षपाती?

‘कोरोनामुक्त झालो, पण प्रवास सोप्पा मुळीच नव्हता’ | भाग 02

‘कोरोनामुक्त झालो, पण प्रवास सोप्पा मुळीच नव्हता’ | भाग 02

No Comment

Leave a Reply