VIDEO | सिस्टरला राखी बांधण्याची हीच खरी वेळ

VIDEO | सिस्टरला राखी बांधण्याची हीच खरी वेळ

सगळ्याच जाहिराती काही प्रॉडक्ट विकत नाहीत. काही जाहिराती विचारही देतात. मॅनकाईंडची ही जाहिरात म्हणूनच आहे खास…

टीम रिडर – जग कोरोनाशी झुंजतंय. भारताची रुग्णसंख्या रोज नवनवे उच्चांक गाठते आहे. मृतांचा आकडाही भीतीदायक आहे. पण अशात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही लक्षणीय आहे.

महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढतेय, ती आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलेल्या दिवसरात्र मेहनतीमुळे. डॉक्टरांसोबत वैद्यकीय यंत्रणेचा कणा असतात त्या रुग्णालयातील सिस्टर्स. फ्रंटलाईन कोरोना वॉरिअर्स म्हणून पाहिलं जाणाऱ्या सिस्टर आपला जीव धोक्यात घालून रुग्णांसाठी काम करत आहेत. जीवाची बाजी लावून आपलं कर्तव्य बजावणाऱ्या या कोरोना वॉरिअर्सला मॅनकाईंडने खास सलाम केलाय.

यंदा शेकडो भाऊ-बहीण राखी साजरी करु शकणार नाहीत. पण हरकत नाही. काय करायचं या शंकेन अस्वस्थ होण्याची गरज नाही. राखी दरवर्षीप्रमाणे साजरी होणारच. खऱ्या अर्थाने आपल्या नात्यांचं रक्षण करणाऱ्यांना यंदा राखी बांधली जाणार. 2020 हे वर्ष आहे, जिथे राखी खरंतर बहिणीने भावाला नाही, तर आपण सगळ्यांनी सिस्टर्सला बांधण्याचीच गरज आहे. आपल्या नात्याला जिवंत ठेवणाऱ्यांना प्रेमाचा एक धागा बांधणं, हीच तर खरी राखी आहे ना?

पाहा स्पेशल व्हिडीओ

हेही इंटरेस्टिंग आहे...

26 जुलै | धडकी भरवणारी तारीख आहे कारण…

26 जुलै | धडकी भरवणारी तारीख आहे कारण…

VIDEO | चक्क PPE कीट घालून डॉक्टरचा डान्स

VIDEO | चक्क PPE कीट घालून डॉक्टरचा डान्स

VIDEO | जिंकण्यासाठी 6 बॉलमध्ये 19 रन हवे होते

VIDEO | जिंकण्यासाठी 6 बॉलमध्ये 19 रन हवे होते

तू मनसेचे ऐलान #प्रिये… मी सावध धनुष्यबाण #प्रिये

तू मनसेचे ऐलान #प्रिये… मी सावध धनुष्यबाण #प्रिये

No Comment

Leave a Reply