VIDEO | जिंकण्यासाठी 6 बॉलमध्ये 19 रन हवे होते

VIDEO | जिंकण्यासाठी 6 बॉलमध्ये 19 रन हवे होते

शेवटच्या ओव्हरआधी महेंद्रसिंह धोनीने एक जबरदस्त रन आऊट केला होता. पण तरिही दबाव भारतावरत होता. या अंडरप्रेशर सामन्यात रोमांचक विजय भारतानं कसा खेचून आणला?

टीम रिडर – 7 नोव्हेंबर 2017. याच दिवशी झालेल्या एका अविस्मरणीय सामन्यात (CRICKET MATCH) भारताने (INDIA) न्यूझीलंडला (NEW ZELAND) धूळ चारली होती. सामना खरं तर 20-20 षटकांचा होणार होता. पण पावसामुळे सामन्यावर पाणी फेरलं गेलं होतं. अखेर 8-8 ओव्हर्सची (OVER) मॅच होणार असं ठरलं.

टीम इंडिया आधी फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरली. पिच फलंदाजांसाठी आव्हानात्मक होता. भारत 8 ओव्हर्समध्ये फक्त 68 धावा करु शकला. पण तरीही भारताने रोमांचकारी सामन्यात विजय खेचून आणला. शेवटच्या सहा बॉल्समध्ये न्यूझीलंडला 19 धावा हव्या होत्या. हार्दीक पांड्याला शेवटची ओव्हर देण्यात आली.

पहिला बॉल डॉट गेला. पण विकेट कीपर धोनीच्या (MS DHONI) हातात बॉल जाईपर्य़ंत न्यूझीलंड फलंदाजांनी एक रन चोरला. दुसऱ्या बॉलवर थेट ब्लॉक होल्समध्ये पडला. स्ट्रेट शॉर्ट मारल्यानं वेगाने बॉल हार्दीकच्या दिशेनं आला. हार्दीकने (HARDIK PANDYA) मध्ये हात टाकला. कॅच होण्याची शक्यता होती. पण बॉलचा स्पीड प्रचंड होता. बॉल हातावर चांगलाच शेकला. पांड्याच्या डाव्या हाताला जबर फटका बसला होता. तो तिथल्या तिथेच मैदानावर बसला.

हाताची कळ पांड्याला अस्वस्थ करत होती. पण तरीही तो रीलिफ स्प्रे मारल्यानंतर रनअपकडे वळला. तिसऱ्या बॉलवर न्यूझीलंड बॉलरने एक कडक सिक्स मारला. त्यानंतर सगळा दबाव हार्दीक पांड्यावर आला होता. याच दबावात एक चूकही पांड्याने केली.. पण तरीही आपण मॅच जिंकलो. कशी?

पाहा व्हिडीओ

OMG! Most Shocking Last Over Finish In T20 Cricket

SHARE,FRIENDSOMG! Most Shocking Last Over Finish In T20 Cricket

Rashmika यांनी वर पोस्ट केले रविवार, ५ जुलै, २०२०
Source – Facebook

हेही इंटरेस्टिंग आहे...

VIDEO | चक्क PPE कीट घालून डॉक्टरचा डान्स

VIDEO | चक्क PPE कीट घालून डॉक्टरचा डान्स

No Comment

Leave a Reply