26 जुलै | धडकी भरवणारी तारीख आहे कारण…

26 जुलै | धडकी भरवणारी तारीख आहे कारण…

26 जुलै लक्षात राहतो तो तुंबलेल्या मुंबईसाठी. मुंबईला ब्रेक लावणाऱ्या या पावसाने खोलवर जखमा केल्या. ज्याचे व्रण अजूनही कायम आहे. पण 26 जुलै या तारखेचा संबंध फक्त मुंबईच्या पावसाशी नाही. तो इतरही अनेक गोष्टींची आहे. अनेक ऐतिहासिक घटनांना 26 जुलै ही तारीख साक्षीदार आहे.

टीम रिडर – 26 जुलै. धडकी भरवणारी तारीख. 26 जुलै म्हटलं की पाण्याखाली गेलेली मुंबईच डोळ्यसमोर येतेय. दरवर्षी 26 जुलैला बुडालेली मुंबई अंगावर काटा आणणाऱ्या आठवणी जाग्या करते. 2005 साली दुपारपासून सुरु झालेल्या पावसाने मुंबईची तुंबई केली. नावाप्रमाणे मिठी नदीनं मुंबईला मिठी मारली. रस्ते, घरं, रेल्वे रुळ, सगळंकाही पाण्याखाली गेलं. काहींचे संसार, काहींचे धंदे, काहींच्या गाड्या, काहींचे जीव तर काहीजण स्वतः या पाण्यात गुदमरुन मेले.

मिठी नदीच्या स्वच्छतेसाठी त्यानंतर वर्ष दोन वर्ष राजकारण होत राहिलं. आरोप-प्रत्यारोप होत राहिले. सत्ताधारी-विरोधक असा सामना अजूनही रंगताना दिसतोच. नदीचा नाला केल्याचे परिणाम मुंबईकरांना भोगावे लागतात. यात पुन्हा 26 जुलै होण्याची भीती प्रत्येकाला सु्न्न करुन टाकते.

26 जुलै, 2005चा घटनाक्रम

– दुपारी 1-2 वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात
– 27 जुलै सकाळी 8.30 वाजेपर्यंत मुसळधार पावसाने मुंबईला झोडपलं
– 18 ते 20 तास झालेल्या नॉनस्टॉप पावसाने मुंबई ठप्प

944 इतक्या रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद
– महाराष्ट्रात पुरामुळे 1100हून अधिक लोकांचा मृत्यू
– लाखो लोक बेघर
– मिठी नदीला आलेल्या पुरामुळे मुंबई उपनगरातील जनजीवन विस्कळीत
– पुरामुळे पसरलेल्या रोगराईमुळे हजारो लोकांची मृत्यू
– पाऊस थांबल्यानंतरही 3 दिवस मुंबई तुंबलेलीच
– 26 जुलैच्या पावसात अडकलेल्या 13 जणांचा गाडीतच गुदमरुन मृत्यू
– काहींचे मृतदेह पाण्यावर तरंगत वाहून गेले
– शेकडो घरांत पहिल्या माळ्यापर्यंत पाणी तुंबलं
– तब्बल 550 कोटी रुपयांपेक्षा जास्त आर्थिक नुकसान
– मुंबई लाईफलाईन असलेली लोकल ठप्प
– ढगफुटीसृश्य पावसामुळे कल्याण स्टेशन पाण्याखाली
– मुंबईतील प्रमुख हायवेवर पाणी साचल्यानं वाहतूक ठप्प

26 जुलैबाबत म्हणावं तसं डॉक्युमेन्टेशन झालं नाही. किंवा झालं जरी असलं तरी ऑनलाईन तशी फारशी काही माहिती उपलब्ध नाही. मिठी नदीबाबत केलेला एक माहितीपट यूट्यूबवर सापडतो. DW हिंदीने केलेला हा व्हिडीओ सोडला, तर ठोस अशी एकही डॉक्युमेन्ट्री 26 जुलैवर दिसत नाही. पण आजही मुंबई तुंबतेच. आजही मुंबई बांधकामं सुरु आहेतच. मुंबईला तुंबण्यापासून कुणी रोखू शकत नाही, अशीही वक्तव्य केली जातात. त्यामुळे प्रत्येक पावसात मुंबईकर दहशतीतच असतात. मुंबई पुन्हा कधीही बुडू शकते, याचा धसका प्रत्येकानेच घेतलेला आहे.

या घटनेनंतर 26 जुलै या तारखेची मुंबईकरांना भीती वाटू लागली. पण इतिहास पाहिला तर 26 जुलै ही तारीख भीतीदायक अशीच आहे. इतिहासात घटलेल्या या घटनांनी 26 जुलै यादिवशी फारशा चांगल्या गोष्टी नोंदवण्यात आलेल्या नाहीत. कारगिल विजय दिवस 26 जुलैला असतो. मात्र त्याव्यतिरीक्त घडलेल्या भयंकर घटना, 26 जुलै या तारखेबाबत भीतीच निर्माण करतात.

26 जुलैला कोणत्या वर्षी काय घडलंय?

1951 : नेदरलँन्डने जर्मनीसोबतचं युद्ध संपवलं
1956 : मिस्रने स्वेज नहरवर कब्जा केला
1965 : ब्रिटेनच्या गुलामगिरीतून मालदीव स्वतंत्र झाला
1997 : श्रीलंकाने क्रिकेट एशिया कपवर आपलं नाव कोरलं
1999 : कारगील विजय दिवस. ऑपरेश विजय फत्तेह करत भारतानं पाकला धूळ चारली
2005 : मुंबईतील मिठी नदीला पूर, 1 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू
2008 : गुजराजच्या अहमदाबाद शहरात 21 साखळी बॉम्बस्फोट, 56 लोक ठार, 200हून अधिक जखमी
2012 : सीरियातील हिंसाचारात 200 हून लोकांचा मृत्यू
2013 : पाकिस्तानच्या पराचिनारमध्ये बॉम्बस्फोट, 57 लोक ठार

हेही वाचा – इन्फोसिसची नोकरी सोडली आणि पाणीपुरी विकून कमाल केली

हेही वाचा – तू मनसेचे ऐलान #प्रिये… मी सावध धनुष्यबाण #प्रिये

हेही इंटरेस्टिंग आहे...

तू मनसेचे ऐलान #प्रिये… मी सावध धनुष्यबाण #प्रिये

तू मनसेचे ऐलान #प्रिये… मी सावध धनुष्यबाण #प्रिये

मटकीला मोड नाय, 2.8 किमीच्या शेषनाग मालगाडीला तोड नाय

मटकीला मोड नाय, 2.8 किमीच्या शेषनाग मालगाडीला तोड नाय

प्रमोद महाजनांची मर्डर मिस्ट्री सस्पेन्स थ्रिलरपेक्षा कमी नाही!

प्रमोद महाजनांची मर्डर मिस्ट्री सस्पेन्स थ्रिलरपेक्षा कमी नाही!

No Comment

Leave a Reply