मटकीला मोड नाय, 2.8 किमीच्या शेषनाग मालगाडीला तोड नाय

मटकीला मोड नाय, 2.8 किमीच्या शेषनाग मालगाडीला तोड नाय

टीम रिडर – तारीख नोंदवून घ्या. 3 जुलै 2020. ऐतिहास दिवस आहे. भारतीय रेल्वेच्या इतिहासात हा दिवस नोंदवला जाईल. कारण नागपूर विभागानं रेल्वेच्या इतिहासात एक नवा विक्रम नोंदवलाय. भारतात पहिल्यांदाच २.८ किलोमीटर लांब मालगाडी चालवण्यात आली. सर्वांत लांब मालगाडी चालवण्याचा विक्रम नागपूर विभागानं आपल्या नावावर केलाय. रेल्वे रुळाची क्षमता तपासण्यासाठी आणि वेळेच्या बचतीबाबत प्रयोग म्हणून ही लांब मालगाडी चालवण्यात आली.

9 रेल्वे इंजिनसह ही मालगाडी धावली असून या मालगाडीत 236 व्हॅगन, चार ब्रेक व्हॅनचा समावेश आहे. या गाडीने दोन स्थानकादरम्यानचे २२ किलोमीटरचे अंतर अवघ्या ४५ मिनिटांत पूर्ण केलं. या मालगाडीला शेषनाग असं नाव देण्यात आलं आहे. एका वेळी चार मालगाड्या एकमेकांना जाडून 2.8 किमीची सगळ्यात मोठी मालगाडी यशस्वीरीत्या धावली आहे.

पाहा व्हिडीओ –

हेही इंटरेस्टिंग आहे...

26 जुलै | धडकी भरवणारी तारीख आहे कारण…

26 जुलै | धडकी भरवणारी तारीख आहे कारण…

तू मनसेचे ऐलान #प्रिये… मी सावध धनुष्यबाण #प्रिये

तू मनसेचे ऐलान #प्रिये… मी सावध धनुष्यबाण #प्रिये

प्रमोद महाजनांची मर्डर मिस्ट्री सस्पेन्स थ्रिलरपेक्षा कमी नाही!

प्रमोद महाजनांची मर्डर मिस्ट्री सस्पेन्स थ्रिलरपेक्षा कमी नाही!

No Comment

Leave a Reply