हीला बघून कुणाला वाटेल की ही लाचखोर आहे?

हीला बघून कुणाला वाटेल की ही लाचखोर आहे?

टीम रिडर – श्वेता जडेजा. हे नाव आहे गुजरातमधील एका पोलिस सबइनस्पेकटरचं. लाच घेतल्याचा आरोपात श्वेता जडेजा यांना अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपीकडून 35 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप श्वेता जडेजा यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यातले 20 लाख रुपये मिळाले होते. 15 लाख बाकी होते. पण त्याआधीच त्यांना अटक करण्यात आली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

बलात्कारातील एका आरोपीला पकडण्यात आलं होतं. हे प्रकरण दाबण्यासाठी लाच मागितल्याचा आल्याचा श्वेता जडेजा यांच्यावरआरोप आहे. याप्रकरणी तपासात लाच घेतल्याचे पुरावे मिळाल्याचाही दावा करण्यात आला आहे. त्यामुळे गुजरात पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. हे प्रकरण दाबण्यासाठी सबइनस्पेक्टर श्वेता जडेजा यांनी 35 लाख रुपयांची मागणी आरोपीकडे केल्याचा आरोप करण्यात आला होता. तशी तक्रार केजल शहा यांनी केली होती. क्राईम ब्रांचकडे लिखित तक्रार आल्यानं याप्रकरणी चौकशी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी तपास केला असता यात श्वेता जडेजा यांनी लाच घेतल्याचं निष्पन्न झालं असल्याचं वृत्त नवभारत टाईम्सने दिलं आहे.

ज्या माणसानं श्वेता जडेजाविरोधात तक्रार केली आहे, त्याच्या भावावर बलात्काराचा आरोप आहे. एक नाही तर दोन दोन बलात्काराचे आरोप तक्रारदाराच्या भावावर आहेत. सबइनस्पेक्टर श्वेताने स्वतःहून आरोपीच्या भावाकडे पैशांची मागणी केल्याचा आरोप केला आहे.

नातेवाईकाच्या मदतीने 20 लाख रुपयांची रक्कम श्वेता जडेजा यांनी घेतली. उरलेली 15 लाख रुपयांची रक्कमही अशाप्रकारे घेतली जाणार असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. उरलेले 15 लाख रुपये मिळवण्यासाठी त्या आरोपीवर दबाव आणत होत्या, असाही आरोप तक्रारदाराकडून करण्यात आला आहे. अहमदाबादमध्ये हा सगळा प्रकार घडला आहे.

व्हॉट्सअप मेसेज आणि फोन कॉल रेकॉर्डींगमधून श्वेता जडेजांनी लाच घेतल्याचे पुरावे समोर आल्याचं वृत्त दैनिक भास्करच्या हिन्दी वेबसाईटने दिलं आहे. एन्टीकरप्शन कायद्याअंतर्गत श्वेता जडेजा यांच्यावर कारवाई करत त्यांना अटक करण्यात आली आहे. 2016-17बॅचच्या श्वेता तिवारी या अहमदाबाद पश्चिम महिला पोलिस ठाण्यात कार्यरत होत्या.

श्वेता जडेजा यांचे फोटो पाहून कुणालाही त्या लाचखोर आहेत, यावर विश्वास बसणार नाही. डॅशिंग आणि निरागस असं एकत्र कॉम्बिनेशन असणारे त्यांची फोटो समोर आले आहेत. एका फोटो वर्दीत स्मित हास्य करताना श्वेता जडेजा दिसतात. दुसऱ्या फोटोत एका सफेद शर्टात आणि कमरेला गन लावल्याचं दिसतंय.

महिला पोलिस सबइन्स्पेक्टर श्वेता जडेजाची लाईफस्टाईल एकदम रॉयल होती, अशेही दावे केले जात आहेत. दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार श्वेता यांच्याकडे असलेल्या मोबाईल फोनची किंमतच जवळपास 1 लाख 12 हजार रुपये होती, असं कळतंय.

श्वेता जडेजा यांना ताब्यात घेण्यात आलं असून अधिक तपास सुरु आहे. मात्र या सगळ्यावरुन अनेक प्रश्न तयार झाले आहेत. बलात्कारप्रकरणाच्या तपासात काही कडक पावलं उचलल्यामुळे श्वेता जडेजा सिस्टमच्या शिकार झाल्या आहेत का? बलात्कारातील आरोपीला महिला पोलिस कशी काय मदत करु शकते? महिला पोलिस सबइन्स्पेक्टरला चौकशीच्या फेऱ्यात अडकवण्याचा प्रयत्न तर होत नाही आहे ना? एक पोलिस असून व्हॉट्सअप आणि फोन कॉल रेकॉर्डींग पुढे अडकल्यानंतर सापडेल, याची साधीशीही क्लपना श्वेताला नसेल का? सगळंच थोडं संशयास्पद आहे ना?

हेही इंटरेस्टिंग आहे...

एक एक करुन अनेक गोष्टी करा. आणि मग एकदा मरा!

एक एक करुन अनेक गोष्टी करा. आणि मग एकदा मरा!

जेव्हा सोनाली बेंद्रे राज ठाकरेंसोबत एअरपोर्टवर जाते…

जेव्हा सोनाली बेंद्रे राज ठाकरेंसोबत एअरपोर्टवर जाते…

खूप श्रीमंत.. खूप खूप श्रीमंत.. आणि मग येतात नाना शंकरशेठ

खूप श्रीमंत.. खूप खूप श्रीमंत.. आणि मग येतात नाना शंकरशेठ

भाऊ तोरसेकर… प्रतिपक्ष की पक्षपाती?

भाऊ तोरसेकर… प्रतिपक्ष की पक्षपाती?

No Comment

Leave a Reply