सुरुवातीला 140नंबरहून आलेला फोन उचल्यास लुटीचा धोका?

सुरुवातीला 140नंबरहून आलेला फोन उचल्यास लुटीचा धोका?

एक मेसेज वायरल झालाय. सुरुवातीला 140 नंबर असलेल्या क्रमांंकावरुन जर तुम्हाला फोन आला, तर तो उचलू नका, असं आवाहन करताना एक पोलिस दिसतो. या पोलिसानं केलेलं आवाहन खरं आहे की खोटं?

टीम रिडर – तुम्हाला 140 या नंबरवरुन फोन आलेला असू शकतो. या नंबरबाबत एक मेसेज प्रचंड वायरल झालाय. या मेसेजमध्ये 140नंबरवरुन येणारे फोन उचलून नका, असं आवाहन करण्यात आलंय. सोबतच पोलिसांचाही एक व्हिडीओ शेअर केला जातोय. या व्हिडीओवर महाराष्ट्र सायबर सेलने एक महत्त्वाचं आवाहन केलंय. 140 या नंबरवरुन येणारे कॉल हे टेलिमार्केटींगचे कॉल्स असतात, असं सायबर सेलकडून सांगण्यात आलं आहे. पण या नंबरवरुन येणारे कॉल रीसिव्ह केले तर बँकेतून पैसे जाणार नाहीत, हे मात्र स्पष्ट करायला सायबर सेल विसरली.

आता हा व्हिडीओ आधी पाहा

01
02
03

घाबरुन जाण्याचं कारण नाही

त्यामुळे घाबरुन जाण्याचं कारण नाही. तसंच बँक डिटेल्स फोनवरुन कुणालाही देऊ नका, असंही आवाहन करण्यात आलंय. वायरल मेसेजमध्ये या नंबरवरुन फोन आल्यास तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक असणारं बँक खातं रिकामं होऊ शकतं, असा इशारा वायरल मेसेजमधून देण्यात आलाय. यावरुन लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. तसंच पोलिस याप्रकारचं आवाहन करताचा एक व्हिडीओही वायरल झाल्यानं नेमका हा काय प्रकार आहे, असा प्रश्न लोकं उपस्थित करत आहेत.

एका खासगी वाहिनीच्या कार्यक्रमाचं प्रमोशन कलाकार करत असल्याचं समोर आलंय. . पोलिसांच्या वेशात असलेल्या कलाकारांनी केलेल्या या प्रमोशनमुळे लोक मात्र चांगलीच गोंधळली आहेत. पण गोंधळू नका. चिंता करु नका.

आता काय करायचं?

140 नंबर सुरुवातीला असणारे फोन कोणत्यातरी कंपनीचे तरी असतात आणि अनेकदा तुम्ही ते उचलतही नसाल. आणि यापुढे जर तुम्हाला अशा एखाद्या नंबरवरुन फोन आलाच तर तो उचलायला हरकत नाही. फक्त 140च नव्हे तर कोणत्याही फोनवरुन तुम्हाला तुमचे बँक डीटेल्स मागितले, तर ते देऊ नका.

तुमचा अकाऊंट नंबर, डेबिट कार्ड नंबर, सीवीव्ही नंबर (डेबिट कार्डच्या मागे असणारा 3 अंकी नंबर), डेबिट किंवा क्रेडीट कार्डचा पीन नंबर कुणालाही देऊ नका. इंटरनेट बँकींग वापरत असाल तर तुमचा पासवर्ड वारंवार बदलत राहा. काळजी घ्या. खाजगीतली माहिती कधीही फोनवरुन देऊ नका. आणि तुम्ही ती दिलीच तर नंतर या गोष्टी आम्ही सांगितल्या नाहीत म्हणून पश्चाताप करु नका. आत्ताच काळजी घ्या.

महाराष्ट्र सायबर सेलने काय म्हटलंय?

हा सगळा सावळा गोंधळ झाल्यानंतर आता हे प्रमोशन थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हेही इंटरेस्टिंग आहे...

घर खरेदी करणं चांगलं की भाड्यानं राहणं चांगलं?

घर खरेदी करणं चांगलं की भाड्यानं राहणं चांगलं?

कुठे गाडी लावू? उबर की ओला? | धंदा एके धंदा

कुठे गाडी लावू? उबर की ओला? | धंदा एके धंदा

सिंगल स्क्रीनवरुन फोन स्क्रीनवर कशी आली ऍडल्ट फिल्म?

सिंगल स्क्रीनवरुन फोन स्क्रीनवर कशी आली ऍडल्ट फिल्म?

इतकी काळजी घेऊनही लक्षणं दिसू लागली – राहुल खिचडी

इतकी काळजी घेऊनही लक्षणं दिसू लागली – राहुल खिचडी

No Comment

Leave a Reply