ज्यांना भाऊ-बहीण मानता, त्यांना हे सांगाच…

ज्यांना भाऊ-बहीण मानता, त्यांना हे सांगाच…

रक्षाबंधन खास सण आहे. छोट्या छोट्या कारणावरुन भांडणारं हे नातं, छोट्या-मोठ्या सगळ्या आनंदात एकमेकांसोबत असतं. रक्षाबंधन म्हणजे फक्त बहिणीची रक्षा करणं नाहीये. फक्त हातावर राखी बांधण्यासाठी नाही आहे. त्यापलिकडची गोष्ट सांगणाऱ्या काही खास गोष्टी...

टीम रिडर – सुरुवात करुयात स्टोरी नंबर वन ने… सुशांत सिंह राजपूतचा दिल बेचारा रिलीज झाला. सुशांतने तर त्यात क्लास काम केलंच आहे. पण किझी बासूही काही कमी नव्हती. नाजूक मनाच्या अशा कित्येक तरुणांना घायाळ करणाऱ्या या किझी बासूचं नाव संजना संघी. रक्षाबंधनचा आणि संजना संघीचा संबंध काय? असा प्रश्न मनात तयार झाला असेल ना. करेक्टए तुमचं. असा प्रश्न तयार झालाच पाहिजे. या प्रश्नांचं उत्तर पुढे सापडेल.

रक्षाबंधनं म्हटलं की बहीण-भावाचं नातं सगळ्यांसमोर येतं. आपल्याकडच्या पिक्चरमध्ये, सीरिअल्समध्येस नाटकांत, सगळीकडे रक्षाबंधनाला बहीण-भावाचंच चित्र दिसतं. या पलिकडे जाऊन जाहिराती बघा.. तिथेही तेच दिसतं. स्वाभाविकच आहे. त्यात काही नवं नाही. नवी गोष्ट सापडते ती तनिष्कच्या जाहिरातीत.

साल असेल 2017. तनिष्कने एक भारी जाहिरात केली. तनिष्कमधून महागडी गिफ्ट देणं, तुमच्या माझ्यासारख्यांच्या खिशाला परवडणारं नसेलही कदाचित. पण तनिष्कने दिलेला थॉट तर जबरीच आहे. इमॅजिन करा.. सख्खा भाऊ पक्का वैरी टाईप किस्से कित्येक सांगता येतील. पण बहिणी-बहिणी एकमेकांशी कशा वागतात, हे आपल्याकडे म्हणावं तसं सिनेमात झळकताना दिसलेलं नाही. म्हणून सिस्टरहूड सांगणारी तनिष्कची जाहिरात सुपरडुपर हिट आहे. त्यामुळे रक्षाबंधन हा काही फक्त भाऊ-बहिणीनेच सेलिब्रेट केला पाहिजे असं नाही. बहिणी-बहिणींसाठीही हा तितकाच खास क्षण असतो… विशेष म्हणजे हा क्षण समजावून सांगितलाय तो आपल्या दिल बेचारा मधल्या किझी बासूने. अर्थात संजना संघीने. काही मोजक्या पण भारी जाहिराती संजना संघीने केल्यात. त्यापैकीच ही एक जाहिरात…

पाहा सिस्टरहूड…

Tanishq – Sisterhood

After all it's the best journey with the best friend, which needs to be cherished and celebrated.Advertiser: Tanishq#RakshaBandhan

Best Ads यांनी वर पोस्ट केले शुक्रवार, ४ ऑगस्ट, २०१७
Source – Facebook

आता स्टोरी नंबर टू. भाऊ सीमेवर तैनात आहे. त्याला पोस्टानं चिट्ठीतून राखी पाठवायची. मग भाऊ ती बहिणीच्या आठवणीत आपल्या मनगटावर बांधणार. मागे एखाद दर्दभरं गाणं. हा स्क्रीनप्ले इतका टिपीकल झालाय, की विचारता सोय नाही. सैनिक असणाऱ्या भावाची एक भारी गोष्ट सांगितली लावा मोबाईलने. कॅडबरी सेलिब्रेशनच्या जाहिराती रक्षाबंधनच्या काळात टीव्ही, मोबाईल, सोशल मीडियात वायरल होतात. त्यात लावा मोबाईलची गोष्ट तुम्हीही मिस केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भाऊ सैनिक आहे. तो सीमेवर ड्यूटीवर नाही. सोबतच आहे. तरिही बहीण त्याला राखी बांधू शकत नाही. कल्पना करा, नेमकं असं काय झालं असेल? तुमच्या कल्पनाशक्ती जागं ठेवत, ही जाहिरात बघा. काही नाती ही रेशमी धाग्यापेक्षाही जास्त मजबूत असतात, हे सांगणारी गोष्ट मनाच्या आरपार जातेच जाते.

पाहा व्हिडीओ…

Lava Mobile – Raksha Bandhan

This heart warming ad is much more than the sister brother relationship. Watch till the end.Advertiser: Lava MobilesAgency: Soho SquareProduction: Uncommonsense Films Pvt. Ltd.

Best Ads यांनी वर पोस्ट केले शनिवार, ६ मे, २०१७
Source – Facebook

सगळ्यात भारी आणि एक नंबर गोष्ट सांगितली ती सर्फ एक्सेलने. डाग अच्छे है, असं सांगणारी सर्फ एक्सेल अजूनही हिट आहे. या सर्फ एक्सेलने बहीण-भावाची एक सुंदर गोष्ट अवघ्या 38 सेकंदात सांगितलीये. बहिणीची छेड काढली, की तिचा भाऊ गुंडांना अद्दल घडवतो, असे सीन कित्येकदा पाहिले असतीलच तुम्ही. आता हा सीनही तुम्ही बघितलाच पाहिजे. कारण शाळेतून घरी जाणाऱ्या या भावाच्या बहिणीसोबत असं काही घडतं आणि त्यावर बहिणीचा भाऊ असा काही बदला घेतो, की खऱ्या अर्थाने रक्षाबंधन सेलिब्रेट झाल्याचा फिल होता.

पाहा व्हिडीओ

Surf Excel – PuddleWar

This is beyond adorable!Advertiser: Surf Excel India

Best Ads यांनी वर पोस्ट केले शनिवार, १४ मे, २०१६
Source – Facebook
हेही वाचा – VIDEO | सिस्टरला राखी बांधण्याची हीच खरी वेळ
हेही वाचा – बायकोशी संवाद टाळणाऱ्या नवऱ्यांना हे पाहावंच लागतंय!
हेही वाचा – 2 वर्षांचा असताना वडील गेले, पेन्शनवर शिकला, आज करोडोत खेळतोय

हेही इंटरेस्टिंग आहे...

Once Upon a Time in मुंबईतले यादगार डायलॉग्स

Once Upon a Time in मुंबईतले यादगार डायलॉग्स

VIDEO | बायकोशी संवाद टाळणाऱ्या नवऱ्यांना हे पाहावंच लागतंय!

VIDEO | बायकोशी संवाद टाळणाऱ्या नवऱ्यांना हे पाहावंच लागतंय!

ब्रेकअप झालाय? मग तर हे सिनेमे पाहायलाच हवे!

ब्रेकअप झालाय? मग तर हे सिनेमे पाहायलाच हवे!

आजारी असाल तर हे सिनेमे बघा! बरं वाटेल

आजारी असाल तर हे सिनेमे बघा! बरं वाटेल

No Comment

Leave a Reply