VIDEO | बायकोशी संवाद टाळणाऱ्या नवऱ्यांना हे पाहावंच लागतंय!

VIDEO | बायकोशी संवाद टाळणाऱ्या नवऱ्यांना हे पाहावंच लागतंय!

वाघ बकरी चहाची एक जाहिरात आहे. जाहिरातीची टॅगलाईन आहे – रिश्तो मे गरमाहट लाए… या जाहिरातीत एक गोड जिंगलसुद्धा आहे. स्केअरक्राओ कम्युनिकेशन्स या ऍड एजेन्सिने केलेली ही जाहिरात अशा कपल्ससाठी आहे.. ज्यांच्या नात्यात गरमाहट नाही. संवाद नाही. ज्यांना एकमेकांसाठी वेळ देण्याचं महत्त्व माहीत नाही.

सिद्धेश सावंत – जाहिराती या लहान असाव्यात असा एक नियमच असतो. पण काही जाहिराती या मोठ्या असतात. आणि अशीच एक जाहिरात आहे वाघ बकरी चायची. उर्मिला कानिटकर-कोठारेला वाघ बकरी चहाच्या जाहिरातीत पाहून मी पहिल्यांदा तर उडालोच होतो. पण ४ मिनिटांची ही जाहिरात पाहताना अजिबात मोठी वाटत नाही. ती तुम्हाला खिळवून ठेवते.

नवरा बायकोचं नातं सांगणारी ही जाहिरात Best Ads या फेसबूक पेजवर आहे. आतापर्यंत पाहिल्या गेलेल्या सर्वाधिक जाहिरातींपैकी ही तब्बल 4 मिनिटांची जाहिरातही आहे, हे विशेष. या जाहिरातीत पती-पत्नीमधील संवादावर अप्रत्यक्षपणे भाष्य करण्यात आलं आहे. अरेंज मॅरेजमध्ये पती-पत्नीमध्ये नवीनच लग्न झाल्यानंतर नेमका संवाद कसा असतो? अवघडलेपण असू शकेल. थोडीची भीती असू शकेल. गोंधळलेपणही असू शकेल. कसं असलं तरी संवाद होणं मात्र महत्त्वाचं असतं. पण ज्यांच्यात संवादच नसतो, अशा कपल्सचं काय होत असेल. नात्यातली गरमाहट ही दाम्पत्य कशी टिकवत असतील?

अरेंज मॅरेज म्हटल्यावर मुली आपल्या नवऱ्यासाठी काय काय त्याग करतात, याची कल्पना फार कमी वेळा त्यांच्या पतीदेवांना ठावूक असते. अशाच एका पतीची गोष्ट वाघ बकरी चहाच्या जाहिरातीत चित्रित करण्यात आली आहे. पतीला आवडतं म्हणून वजन कमी करायचं. पतीला आवडतं म्हणून कधीही चहाचा घोट न प्यायलेली बायको नवऱ्यासाठी चहा पिणं सुरु करते. नवऱ्याचा आवड जपणाऱ्या या बायकोशी कामात असणाऱ्या नवऱ्याकडे जराही वेळ नाही. नवरा सदानकदा लॅपटॉपमध्ये तोंड खूपसून. किंवा मग फोनवर बिझी. पण आपल्या माणसांशी संवाद साधण्यासाठी वेळ काढावा लागणं, ही गोष्ट जरा चक्रावून टाकणारीच आहे. जर का अशा प्रकारे तुम्हाला वेळ काढावा लागत असेल, मग ही जाहिरात तुमच्यासाठीच आहे.

नवऱ्याला साधं आपल्या बायकोशी बोलायला किंवा तिचं ऐकून घ्यायला वेळ नसेल… तर अशावेळी बायको नवऱ्याला सोडून जाणार नाही तर काय करणार? या जाहिरातीत उर्मिला कानेटकर-कोठारेही नवऱ्याला सोडूनच जाते. पण जाता जाता आपल्या चुकांची जाणिव करुन देणारी एक गोष्ट करुन जाते. काय असते ही गोष्ट.. त्यासाठी ही जाहिरात तर पाहावीच लागेत. गॅरेंटीने सांगतो.. 4 मिनिटं वाया नाही जाणार… अनेकदा जाहिराती या फक्त प्रॉडक्टचं मार्केटिंग नाही करत. कधी कधी त्या आपल्या मेंदूलाही खाद्य पुरवतात. त्यामुळे ही जाहिरात तर Must Watch आहे.

Rishton Ki Garmahat

Today, we get so caught up in our work that we forget to make time for relationships.And slowly, they lose the warmth that once made them special.This film will not only tug at your heartstrings but will also make you re-look at the way you look at your relationships.It might be a 4-minute long film, but worth watching.Advertiser: Wagh Bakri TeaAgency: Scarecrow Communications

Best Ads यांनी वर पोस्ट केले सोमवार, २६ जानेवारी, २०१५
Video
हेही वाचा – आजारी असाल तर हे सिनेमे बघा! बरं वाटेल
हेही वाचा – सिंगल स्क्रीनवरुन फोन स्क्रीनवर कशी आली ऍडल्ट फिल्म?
हेही वाचा – ब्रेकअप झालाय? मग तर हे सिनेमे पाहायलाच हवे!

हेही इंटरेस्टिंग आहे...

Once Upon a Time in मुंबईतले यादगार डायलॉग्स

Once Upon a Time in मुंबईतले यादगार डायलॉग्स

ज्यांना भाऊ-बहीण मानता, त्यांना हे सांगाच…

ज्यांना भाऊ-बहीण मानता, त्यांना हे सांगाच…

ब्रेकअप झालाय? मग तर हे सिनेमे पाहायलाच हवे!

ब्रेकअप झालाय? मग तर हे सिनेमे पाहायलाच हवे!

आजारी असाल तर हे सिनेमे बघा! बरं वाटेल

आजारी असाल तर हे सिनेमे बघा! बरं वाटेल

No Comment

Leave a Reply