यांचा पॅटर्नच वेगळाय! अनुराग कश्यप दिग्दर्शित BEST MOVIES

यांचा पॅटर्नच वेगळाय! अनुराग कश्यप दिग्दर्शित BEST MOVIES

बॉलिवूडच्या दुनियेत प्रयोगशील दिग्दर्शक फारसे नाहीत. त्यात अनुराग कश्यप हे नाव पहिलं घ्यावं लागेल. अनुराग कश्यपने ( Anurag Kashyap)सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या विषयांवर सिनेमे केले. सगळेच सिनेमे बॉक्सऑफिसवर दणकट चालले अशातला भाग अजिबातच नाही. पण हे सर्व सिनेमे प्रयोग म्हणून याआधी कुणीही करायचं धाडस दाखवलं नाही. कलात्मकता जपत, विषयाशी संपूर्ण प्रामाणिकता दाखवण्याचा प्रयत्न आपल्याला अनुराद कश्यपच्या सिनेमात दिसतो. अशाच काही अनुराग कश्यप दिग्दर्शित सिनेमांची यादी

ब्लॅक फ्रायडे – Black Friday (Crime/Docudrama)

हा एक डॉक्युड्रामा आहे. 1993 साली झालेल्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यावर तयार करण्यात आलेला हा सिनेमा आजही अभ्यासला जातो. 9 फेब्रुवारी 2007ला हा सिनेमा प्रदर्शित झाला. 8 कोटी रुपयांचा गल्ला ब्लॅक फ्रायडेने बॉक्स ऑफिसवर जमवला होता.

पाहा ट्रेलर

गुलाल – Gulaal (Thriller/Crime)

कॉलेज विश्वातील राजकारणाचा विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर किती खोलवर परिणाम होतो, यावर प्रकाश टाकणारा गुलाल सिनेमा जबरदस्त आहे. या सिनेमाच्या कथानकासोबत या सिनेमाची गाणीही अत्यंत क्रिएटीव्ह होती.. पियुष मिश्रा आणि केके मेनन यांनी गुलालमध्ये केलेला अभिनय तगड आहे. 13 मार्च 2009 ला हा सिनेमा रिलीज झाला. जातीयवादाची पाळंमुळं किती खोलवर रुतली आहे, त्यावर परखड भाष्य करणारा गुलाल सिनेमा आपल्या आजूबाजूला आजही खराखुरा वाटतो.

पाहा ट्रेलर

देव डी – Dev.D (Drama/Romance)

देव डी हा आधुनिक देवदासच आहे. या सिनेमाचं कथानक आणि या सिनेमाच चित्रिकरण पथडीतल्या सिनेमांच्या तुलनेत प्रचंड वेगळं होतं. त्यामुळे हा सिनेमा वेगळा ठरला. इतकंच नाही तर या सिनेमातली गाणीही प्रचंड गाजली. लहानपणीच्या प्रेयसीसोबत ब्रेक झाल्यानंतर मोठे पाणी देवचं काय होतं? याची कथा अजूनही तितकीच आवडीनं लोक पाहतात. अमित त्रिवेदीने या सिनेमाची गाणी केली. त्यानंतर अमित त्रिवेदीच्याही करिअरला एक वेगळंच वळण मिळालं. 6 फेब्रुवारी 2009ला देव डी रिलीज झाला. या सिनेमाची प्रचंड चर्चाही झाली.

पाहा ट्रेलर

गँग्स ऑफ वासेपूर भाग 01, भाग 02 Gangs of Wasseypur (Drama/Crime)

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या करिअरला वळण देणारा सिनेमा म्हणजे गँग्स ऑफ वासेपूर. मनोज वायपेयीपासून सुरु होणारा हा सिनेमा नवाजुद्दीन सिद्दीकीपर्यंतच्या प्रवासात अनुराग कश्यपने तीन पिढ्या दाखवल्या. त्यात या सिनेमाचे दोन पार्ट आले. दोन्ही पार्टमधली गाणी, रामाधिर सिंह, तसंत अनेक संवादही तुफान गाजले. स्नेहा खानोलकरनं दिलेल्या संगितानं या सिनेमाला चारचांद लावले. 2012 मध्येच या सिनेमाचे दोन्हीही भाग रिलीज झाले. या सिनेमांची बॉक्स ऑफिसवरही बरी कमाई केली होती.

पाहा ट्रेलर

अग्ली – Ugly (Thriller/Drama)

2014मध्ये अग्ली रिलीज झाला. त्यावेळी समीक्षकांनी या सिनेमाला डोक्यावर घेतलं होतं. साडेचार कोटीत बनलेल्या या सिनेमाचे 6 कोटीपेक्षा जास्त गल्ला जमवला. या सिनेमात मराठमोठ्या गिरीश कुलकर्णीने केलेलं कामही तुफान गाजलं. रोनीत रॉय, तेजस्विनी कोल्हापुरे, राहुल भट यांच्याही प्रमुख भूमिका या सिनेमात आहेत. तगडी गोष्ट, आणि तितकीच भेदत पटकथा अनुभवायची असेल, तर अग्ली सिनेमाला पर्याय नाही. या सिनेमातले संवादही दिलखेच आहेत.

पाहा ट्रेलर

मुक्काबाज Mukkabaaz (Sport/Action)

मुक्काबाजमध्ये गोष्ट आहे श्रवण सिंगची. एका छोट्या जातीतला मुलगा मोठी स्वप्न पाहतो. त्यासाठी झगडतो. शेवटपर्यंत लढतो. त्यातच तो प्रेमात पडतो. बॉक्सर होण्याचं स्वप्न पाहिलेल्या श्रवणचं स्वप्न प्रेमामुळे कसं आणखी आव्हानात्मक बनतं, याची गोष्ट म्हणजे मुक्काबाज. जीमी शेरगली, विनीत कुमार आणि रवीकिशन यांच्या मुक्काबाज सिनेमात प्रमुख भूमिका आहे. 2018 साली आलेला मुक्काबाज सिनेमा तुफान चर्चिला गेला होता. पण बॉक्स ऑफिसवर म्हणावी तशी कमाल हा सिनेमा करु शकला नाही.

पाहा ट्रेलर

हेही इंटरेस्टिंग आहे...

Once Upon a Time in मुंबईतले यादगार डायलॉग्स

Once Upon a Time in मुंबईतले यादगार डायलॉग्स

ज्यांना भाऊ-बहीण मानता, त्यांना हे सांगाच…

ज्यांना भाऊ-बहीण मानता, त्यांना हे सांगाच…

VIDEO | बायकोशी संवाद टाळणाऱ्या नवऱ्यांना हे पाहावंच लागतंय!

VIDEO | बायकोशी संवाद टाळणाऱ्या नवऱ्यांना हे पाहावंच लागतंय!

ब्रेकअप झालाय? मग तर हे सिनेमे पाहायलाच हवे!

ब्रेकअप झालाय? मग तर हे सिनेमे पाहायलाच हवे!

No Comment

Leave a Reply